Mumbai News, 03 Apr : वक्फ सुधारणा विधेयकावरून राज्यासह देशातील वातावरण तापलं होतं. अशातच बुधवारी (ता. 02) मध्यरात्री हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं. मात्र. हे विधेयक लोकसभेत सादर करण्याच्या आधीपासून ठाकरेंची शिवसेना हा विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान करणार की विरोधात? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं.
तर हे बील लोकसभेत सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी, "उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?" असा सवाल करत ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता.
पहिल्यापासून शिवसेना हिंदुत्ववादी विचारांची आहे, मात्र आता ठाकरे मुस्लिम मतांसाठी आपली विचारधारा सोडत असल्याचा आरोप भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जातो. त्यामुळे आता या विधेयकावरून ठाकरेसेना नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
मात्र, बुधवारी लोकसभेत ठाकरेंच्या शिवसेनेने वक्फ दुरूस्ती कायद्याच्या विरोधात भूमिका घेतली आणि विरोधातच मतदान केलं. वक्फ विधेयकात पारदर्शीपणा नसून सरकारचा हेतू योग्य नसल्याची आरोप ठाकरे गटाने केला आहे. ठाकरें गटाच्या याच भूमिकेवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
यावेळी त्यांनी शिवसैनिक ठाकरेंची शिवसेना सोडण्याच्या मानसिकतेत असल्याचा दावा केला आहे. तसंच या शिवसैनिकांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आपण ठेवला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडत काँग्रेसचे विचार ठाकरेंनी मान्य केल्याचा हा आणखी एक पुरावा जनतेसमोर आला आहे.
एका विशिष्ट समाजाच्या मतांवर डोळा ठेवत त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. मात्र, त्यांच्या या भूमिकेमुळे अनेक शिवसैनिक ठाकरेंची शिवसेना सोडण्याच्या मानसिकतेत आहे. अनेकजण पक्ष सोडणार असून अशा लोकांचा पक्षप्रवेश मी मंगळवारी घेतला आहे."
तसंच वक्फ सुधारणा कायद्याचा विरोध करणं म्हणजे महाराष्ट्राचा आणि देशाचा अपमान आहे. उद्धव ठाकरे साहेबांना कोणत्याही परिस्थितीत जनता माफ करणार नाही. ठाकरेंचे खासदार निवडून देणाऱ्या लोकांना आता आपण चूक केली असं वाटत असेल. त्यामुळे लोक आता पुन्हा ठाकरेंच्या उमेदवारांना निवडून देणार नाहीत, असंही बावनकुळे यावेळी म्हणाले.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.