

Pune News: पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं घवघवीत यश मिळवले असून, एकूण 73 जागांपैकी तब्बल 51 जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले असून, अध्यक्षपदासाठी आवश्यक असलेला 38 सदस्यांचा बहुमताचा आकडा सहज गाठला गेला आहे. परिणामी, महायुतीतील इतर मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि एकनाथ शिंदेंंच्या शिवसेनेला सत्तेत सामावून घेण्याची मानसिकता सध्यातरी राष्ट्रवादीची नसल्याचं पाहायला मिळत आहे.
पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निर्णायक विजयाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण एकतर्फी झाले असताना, पक्षाला 'मिनी मंत्रालय'वर पूर्ण ताबा मिळवणे आवश्यक असल्याचं स्थानिक नेत्यांचे म्हणणं आहे. पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "जिल्हा परिषदेत आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. महायुतीचा प्रयोग करण्याची गरज नाही. पक्ष एकहाती सत्ता स्थापन करावी," अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
त्यामुळे अध्यक्षपदासह स्थायी समिती आणि विविध विषय समित्यांवरही राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहणार असून महायुती न झाल्यास अधिकाधिक निवडून आलेल्या सदस्यांना संधी देणे शक्य असून त्यामध्ये इतर भागीदार येणार नाहीत असं बोललं जात आहे.
दुसरीकडे, पुणे जिल्हा परिषदेमध्ये सत्तेचं स्वप्नं बघणाऱ्या भारतीय जनता पार्टीला फक्त 10 जागा मिळाल्या, तर शिवसेनेला 5 जागा मिळाल्या. या दोन्ही पक्षांच्या जागांची एकत्रित बेरीज केली तरी ती बहुमताच्या आकड्यापासून खूप दूर राहते.
त्यामुळे राष्ट्रवादी सोबतच आपण देखील सत्तेत राहावं अशी इच्छा महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची असल्याचं बोललं जात आहे. मात्र, सद्यपरिस्थितीला महायुती म्हणून सत्तास्थापनेची शक्यता पूर्णपणे धूसर झाली आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.