Sharad Pawar and Ajit Pawar : 15 दिवसांत दादा अन् साहेब आले तिसऱ्यांदा एकत्र; अजित पवार म्हणाले, 'बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याची गरज नाही..'

Maharashtra politics News : गेल्या महिनाभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तीनदा विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्याचे पाहायला मिळाले आहे.
Sharad Pawar| Ajit Pawar
Sharad Pawar| Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकमेकांना टाळी देण्याची चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे गेल्या महिनाभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तीनदा विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का ? या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा उपयोग कशा पद्धतीने करण्यात येऊ शकतो. याबाबत सोमवारी पुण्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शरद पवार हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अजित पवार म्हणाले, 'एआय तंत्रज्ञान पद्धतीने शेती क्षेत्रामध्ये वापरण्यात येऊ शकते. यासाठी राज्य सरकारने 500 कोटी रुपये तरतूद केली आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीसाठी केल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. यामुळे पाणी खत यांची बचत देखील मोठ्या प्रमाणात होऊ शकते.'

Sharad Pawar| Ajit Pawar
Eknath Shinde Solapur Tour : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सोलापूर दौरा रद्द; सावंत कुटुंबातील ‘हे’ कारण चर्चेत....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना घर देण्याचे स्वप्न साकारले आहे, त्याचा टार्गेट दिले आहे. सर्वांसाठी घर ही योजना राज्यात राबवली जात आहे. पुणे विभागात 35 हजार घरांच्या निर्मिती कार्यक्रम हाती घेतला आहे, वेगवेगळ्या भागात जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून काम केले जाईल. 80 वर्ष जाईल असे घर बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Sharad Pawar| Ajit Pawar
NCP Ajit Pawar: वाचाळवीरांवर अजित पवार नियंत्रण कसे आणणार?

बारामती लोकसभा मतदारसंघातून भोर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार संग्राम थोपटे हे भाजप प्रवेश करणार आहेत. याबाबत विचारला असता अजित पवार म्हणाले, 'कोणी कुठे जायचे हा त्यांचा प्रश्न आहे. ते एका पक्षाचे माजी आमदार आहेत. त्यांनी कुठे जायचे हा त्यांचा निर्णय असल्याचे सांगत अजित पवार यांनी अधिकच बोलणे टाळले.

Sharad Pawar| Ajit Pawar
MNS Shivsena UBT alliance : मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांवरून सदावर्तेंनी ठाकरे बंधूंची खिल्ली उडवली; म्हणाले, "दोघांचे पक्ष गल्लीतून..."

शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांच्या गेल्या तीन महिन्यात विविध कार्यक्रमानिमित्त झालेल्या भेटींबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, 'शरद पवार हे साखरपुड्याच्या कार्यक्रमाला आले होते. साखरपुडा कार्यक्रम असला की परिवारातील लोक एकत्र येतात, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामध्ये बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याची गरज नाही. तो पवार कुटुंबियांचा अंतर्गत प्रश्न आहे.'

Sharad Pawar| Ajit Pawar
NCP News : खामगावमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार; माजी आमदार अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाणार

त्यासोबतच इतर ठिकाणी पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्या ठिकाणी मी संस्थेचा सदस्य आहे. मी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही तर त्या संस्थेचा सदस्य म्हणून जातो. इतरही पक्षाचे नेते यामध्ये सदस्य आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी या बैठकीला उपस्थित राहिलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar| Ajit Pawar
Uddhav Thackrey Politics : तुम्हीच राजसाहेबांना मातोश्रीचे निमंत्रण द्या! उद्धव ठाकरेंना नेत्यांची कळकळीची विनंती...

ही बैठक पण एआय बाबत होती. ज्यातून शेतकरी वर्गाला फायदा होतील अशा गोष्टी आहेत. त्या केल्या पाहिजेत, अशा वेळी एकत्रित बसावे लागत आहे, सगळे इतर नेते पण बसतात, काही विषय राजकारणा पलीकडे बघायचे असतात, निवडणुका झाल्या आहेत, जनतेच्या काही अपेक्षा आहेत. माहिती, विचार देवाणघेवाण करणे, सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून एकत्र आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

Sharad Pawar| Ajit Pawar
Gadchiroli Naxal Operation : नक्षलवादविरोधी अभियान; महानिरीक्षक संदीप पाटलांचं 'चक्रव्यूह' यशस्वी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com