Ajit Pawar News : ...अन् अजित पवार वाहन ताफा थांबवून जखमीच्या मदतीला धावले!

Ajit Pawar rushed to help the person injured : पुण्यात संचेती हॉस्पिटलजवळ झाला होता अपघात; जखमींला धीर देत त्याची विचारपूसही केली.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज(मंगळवार) पुण्यात एका अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीची स्वत: वाहनातून उतरून मदत केल्याची घटना घडली. यावेळी

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असताना. सर्किट हाऊसकडे आपल्या शासकीय वाहनाने जात होते.

दरम्यान, संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकी स्वाराचा व रिक्षाचा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार खाली पडल्याने तो जखमी झाला आणि त्याच्या हातून रक्तस्त्रावही होवू लागला होता.

हे पाहून अजित पवार(Ajit Pawar) यांनी त्वरित आपला ताफा थांबवत अपघातग्रस्त व्यक्तीला धीर दिला आणि त्याची विचारपूस करत त्याच्याशी संवाद साधला

Ajit Pawar
Ajit Pawar Video : अमित शहांपुढे 'बिहार पॅटर्न'प्रमाणे मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवला? अजितदादांची पहिली प्रतिक्रिया...

अजित पवारांनी अपघातग्रस्त व्यक्तीवर त्यांच्या वाहन ताफ्यातील अँब्युलन्समधील डॉक्टरांना ताबडतोब उपचार करण्यास सांगितले आणि आपल्या पुढील कामासाठी अजित पवार रवाना झाले.

Ajit Pawar
jayant Patil News : ... तर अजितदादा महायुतीतून वेगळे लढतील; जयंत पाटलांनी सांगितलं 'हे' कारण

दरम्यान, मुंबईत सोमवारी गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात विमानतळावर चर्चा झाली. तेव्हा, अजितदादा पवार यांनी गृहमंत्री शाह यांच्यापुढे 'बिहार पॅटर्न'प्रमाणे महाराष्ट्रातही मुख्यमंत्रिपद ठरवा, असं प्रस्ताव मांडल्याचं वृत्त एका वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलं होतं. यावरून राजकीच चर्चा रंगली होती. यावर अजितदादा पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

"गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही," असं स्पष्टीकरण अजितदादा पवार यांनी दिलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com