

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची घोषणा केली. पवारांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांच्यावर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. यावरुन अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. या चर्चांना अजित पवारांनी पूर्णविराम दिला.
कार्यध्यक्ष पदाची घोषणा झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) पुण्याकडे निघाले. पुण्यात पोहोचल्यानंतर अजितदादांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या वेळी अजित पवार म्हणाले, 'कार्यक्रमात घोषणा झाल्यानंतर मी लगेच निघालो, मी समाधानी आहे. विमानतळावर पोहोचल्यावर काही जणांचे फोन आले. मी नाराज असल्याच्या बातम्या चालवण्यात आल्या. असल्या बातम्या देण बंद करा. माझा उद्या एक नियोजित कार्यक्रम साताऱ्याला असल्याने दिल्लीतून पुण्यात आलो'.
आम्ही पक्षांतर्गत कमिटी केली होती. या कमिटीमध्ये पक्षाचे १६ ते १७ जण होते. या कमिटीत मीच सुचवले होते की, ''कार्याध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची निवड करावी. त्यावेळी पवार साहेबांच्या राजीनामा मागे घेण्याच्या विषयावरच चर्चा झाली. लोकशाहीत बहुसंख्याच्या मताचा आदर करावा लागतो. त्यामुळे त्यापद्धतीने निर्णय घेण्यात आला.
'मी व प्रफुल पटेल हे एकाच वेळी खासदार झालो होतो. मी सहा महिन्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर मी राज्याच्या राजकारणात आलो. सुप्रियांचे नाव हे नावाजलेले आहे. मी राज्याच्या राजकारणात असणार आहे, तर सुप्रिया सुळे राष्ट्रीय राजकारणात असतील, मी अनेकवेळा सांगितले. माझ्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. कुणीच कुणाला कोणाला शह देत नसते. कार्यध्यक्षपदाच्या निवडीचा प्रश्न पक्षांतर्गत प्रश्न आहे. इतरांनी त्यामध्ये नाक खूपसू नये, असेही पवार म्हणाले.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.