Ajit Pawar Statement : ''...हे पाहिल्याशिवाय राज्यात लोकप्रिय घोषणा जाहीर करता येणार नाहीत !''; अजितदादा स्पष्टच बोलले

NCP Political News : '' भाजपलाही त्याचीच भीती...''
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

मिलिंद संगई

Baramati : काही योजना निवडणुका जिंकण्यासाठी तर काही योजना जनतेच्या भल्यासाठी असतात. अनेक मान्यवरांची याबाबत वेगळी मते आहेत. त्यामुळे याबाबत बारकाईनं विचार करावा लागेल. कारण घोषणा करताना अर्थव्यवस्थेला ती योजना मोफत करणं झेपलं पाहिजे याचाही विचार करावाच लागेल असं स्पष्ट मत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी बारामतीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कर्नाटकमधील सिध्दरामय्या यांच्या मोफत घोषणांवर भाष्य करतानाच राज्यातील सरकारला फटकारलं आहे. पवार म्हणाले, कर्नाटकमध्ये विविध लोकप्रिय योजना नवीन सरकारने राबविण्याचा निर्णय घेतल्यानं तेथील राज्य शासनावर 65 हजार कोटींचा बोजा पडणार आहे. पण लोकांना आश्वासन दिल्यानं त्यांनी या योजना कार्यान्वित केल्या असल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी दिली आहे.

पण राज्यात अशा योजना घोषित करताना अर्थव्यवस्थेवर किती ताण येईल हे पाहिल्याशिवाय त्या जाहीर करता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडली.

Ajit Pawar
Karnataka News : ''लोकसभेपूर्वी काँग्रेसचे कर्नाटकमधील सरकार कोसळणार; भाजपा नेत्याच्या दाव्याने खळबळ''

अजित पवार म्हणाले, स्वत: सिध्दरामय्या(Siddaramaiah) तेरा वर्ष कर्नाटकचे अर्थमंत्री आहेत व आताही मुख्यमंत्री झाल्यावरही त्यांनी अर्थखाते त्यांच्याकडेच ठेवले आहे. त्यांनी ज्या लोकप्रिय घोषणा केल्या त्याने अर्थव्यवस्थेवर किती ताण येईल याची मला उत्सुकता होती. त्यामुळे मी त्यांच्याशी याबाबत चर्चा केली.

भाजपलाही त्याचीच भीती....

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडील योजना महाराष्ट्रात राबवा असे सांगितले असले तरी त्या योजनेच्या दुसऱ्या बाजूही तपासून घ्याव्या लागतील, असे सांगून अजित पवार म्हणाले, ही योजना सुरु झाल्यावर तेथील बसेसमध्ये पुरुषांना व तिकीट काढणाऱ्यांना जागाच मिळत नाही अशी माहिती मला समजली. यात मोफत प्रवास योजना दिल्यावर बसेस मध्ये पन्नास टक्के महिला व पन्नास टक्के पुरुष असे काहीतरी करावं लागेल असंही पवार यावेळी म्हणाले.

Ajit Pawar
Siddaramaiah On Sharad Pawar: मुख्यमंत्री सिद्धरामय्या शरद पवारांना म्हणाले, महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न राबवा...

मतविभागणी होऊ नये यासाठी काही पक्ष एकत्र आले तर त्याचा परिणाम सत्ताधारी पक्षावर निश्चित होतो. भाजपलाही त्याचीच भीती वाटत आहे असे पवार एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

....हा भुजबळांचा अधिकार आहे!

छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी प्रदेशाध्यक्षपदावर दावा करणे हा त्यांचा अधिकार आहे, पक्षात लोकशाही आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपले मत मोकळेपणाने मांडू शकतो. वरिष्ठ याबाबत योग्य तो निर्णय घेतील. गेली 32 वर्षे मंत्रीपदासह अनेक पदांवर काम केल्यानंतर आता संघटना मजबूत करण्यासाठी संघटनेत संधी मिळावी अशी मी मागणी केली तर त्यात काही गैर आहे असे वाटत नसल्याचेही पवार म्हणाले.

Ajit Pawar
Nanded Shivsena News : मुख्यमंत्र्यांसोबत ट्रॅक्टरमध्ये बसण्यासाठी सत्तार, बांगर, पाटील यांच्यात चढाओढ..

...अजिबात मुंबई तुंबणार नाही

मुंबई तुंबल्याचे विचारल्यावर किती कामे सुरु आहेत, कामे सुरु असल्याने काही ठिकाणी पाणी साचले आहे. कामे झाल्यावर बघा, अजिबात मुंबई तुंबणार नाही असा उपरोधिक टोला अजित पवारांनी सरकारला लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com