

Nana Patole News: राज्यात महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरुन चढाओढ सुरु झाल्याचं दिसत आहे. याबाबत खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीच भाष्य केलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Ajit Pawar to be Chief Minister? Now Nana Patole also said, Modi hai to mumkin hain)
अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होतील का, असा प्रश्न त्यांना विचारला असता, नाना पटोले म्हणाले की, राजकारणात काहीही होऊ शकतं. इथे कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कुणीही शत्रू नसतो. मोदी है तो मुमकिन है. असं सूचक वक्तव्यही नाना पटोले यांनी केलं आहे. तसेच, आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न विचारला असता, तिन्ही पक्षांकडे आपापले उमेदवार आहे. पण भविष्यात राज्यात काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार, असा दावा विश्वासही नाना पटोले यांनी केला आहे. (Congress News)
काँग्रेस लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. सध्या कोणतीही निवडणूक नाही, पण जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. असं उत्तर नाना पटोले यांनी दिलं. त्याचवेळी महाराष्ट्रात यावेळी काँग्रेस नंबर वनचा पक्ष असेल. काँग्रेस सर्वाधिक आमदार निवडून येतील आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला. (Mahavikas Aghdi Politics)
याचवेळी त्यांनी महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात झालेल्या घटनेवरुनही थेट केंद्रीय मंत्री अमित शहांवर टिकास्त्र डागलं आहे. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शाहांची एसीमध्ये सोय केली होती. पण महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात आलेली जनता मात्र उन्हात बसली होती. 12 वाजता पहिला मृत्यू होऊनही कार्यक्रम चालू होता. लोकांचा जीव गेला तरी यांना काही फरक पडत नाही. सरकार मृतांचा आकडा कमी दाखवत आहे. पण चेंगराचेंगरीमुळे काही लोक मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारने नेमका आकडा जाहीर करावा, अशी मागणीही नाना पटोलेंनी केली आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.