Pune University| मुंबईसह पुणे विद्यापीठाला मिळणार लवकरच नवे कुलगुरू

Pune University| महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०१६ च्या विद्यापीठ कायद्यात बदल करण्यात आला होता.
Pune University|
Pune University|
Published on
Updated on

पुणे : मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ या विद्यापीठांच्या शासन निर्णयाअभावी रखडलेल्या कुलगुरू निवड प्रक्रिया अखेर मार्गी लागल्या आहेत. आज शासनाने मुंबई उच्च न्यायालयात धनंजय कुलकर्णी आणि बागेश्री मंथळकर यांनी कुलगुरु निवडीबाबत जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील उत्तरादाखल प्रतिज्ञा पत्राद्वारे वरील विद्यापीठाच्या कुलगुरू निवड समितीवरील शासन प्रतिनिधींची नावे जाहीर केली.

कुलकर्णी आणि मंथळकर यांनी दाखल केलेली याचिका कुलगुरू निवड प्रक्रिया शासन निर्णय अभावी स्थगित होती, या स्थगिती विरोधात दाखल करण्यात आली होती. या सरकारच्या निर्णयामुळे विद्यापीठांना पुढील दोन महिन्यात नियमित कुलगुरू मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे. आता तरी विद्यापिठांच्या कुलगुरू निवड प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Pune University|
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास शिंदे-फडणवीस सरकारच कारणीभूत

महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०१६ च्या विद्यापीठ कायद्यात बदल करण्यात आला होता. पण राज्यपालांनी या कायद्याला मंजुरी दिली नाही. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंची निवड प्रक्रिया रखडली होती. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर मे महिन्यात निवृत्त होणार होते. त्यापूर्वीच ही प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते.

दूसरीकडे डॉ. करमळकर यांच्या निवृत्तीनंतर विद्यापीठाचा दैनंदिन कारभार चालवण्यासाठी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांना प्रभारी कुलगुरूपदावर नेमण्यात आले. तेव्हाापासून म्हणजे आता जवळपास चार महिने उलटून गेले, तरी नव्या कुलगुरूंची निवड रखडली होती. पण आता ही कुलगुरुंच्या निवडीची प्रक्रिया सुरु होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com