वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास शिंदे-फडणवीस सरकारच कारणीभूत

PCMC news| मावळात आंबळे येथे सेमी कंडक्टर्स उत्पादन करणारा हा मोठा प्रकल्प उभा राहणार होता.
PCMC news|
PCMC news|
Published on
Updated on

पिंपरी : महाराष्ट्रात मावळ तालुक्यात (जि.पुणे) तळेगाव एमआयडीसीत होऊ घातलेला दीड लाख कोटी रुपयांचा दीड लाख रोजगारनिर्मिीतीचा वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले आहे. हा प्रकल्प जेथे होणार होता, त्या मावळचे आमदार शेळके यांनीही यावरून हल्लाबोल करताना मावळातील तरुणांचा रोजगार हिरावून घेण्याचे पाप करु नका,असे आवाहन केले आहे.

वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास शिंदे-फडणवीस सरकारच कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.शेळके यांनी केला आहे.केवळ राजकारणासाठी मावळातील तरुणांचा रोजगार हिरावून घेण्याचे पाप करू नका,असे त्यांनी म्हटले आहे.हा प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय कंपनीने घेतल्यामुळे महाराष्ट्राबरोबरच मावळ तालुक्याचेही मोठे नुकसान झाले आहे. मावळात आंबळे येथे सेमी कंडक्टर्स उत्पादन करणारा हा मोठा प्रकल्प उभा राहणार होता. त्यामुळे महाराष्ट्राबरोबरच मावळातील हजारो तरुणांना रोजगाराची संधी मिळणार होती. मात्र,आता तो गुजरातमध्ये जाण्यामागे 'गुजरातधार्जिण्या' शिंदे-फडणवीस सरकाचाच हात आहे,असे ते म्हणाले.

PCMC news|
PCMC news| सत्ताबदलाचा परिणाम; पिंपरी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचीही मुदतपूर्व बदली

महाविकास आघाडी सरकारने तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रयत्न करून महाराष्ट्राच्या व मावळच्या विकासाला गती देणारा हा औद्योगिक प्रकल्प आणला होता.परंतु विद्यमान सरकारमधील नेत्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प गुजरातला गेला,असा दावा आ.शेळकेंनी केला आहे.तो मावळच्या भूमीत होणार असल्यामुळे त्याचा लाभ महाराष्ट्रासह मावळातील भूमिपुत्रांना, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मिळणार होता. प्रत्यक्ष नोकरीबरोबरच अप्रत्यक्षपणे विविध उद्योग - व्यवसायांना देखील चालना मिळणार होती. त्यातून अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होऊन मावळच्या विकासाला देखील मोठी गती मिळाली असती. त्यामुळे तो मावळातून जाणे हे केवळ दुर्दैवीच नव्हे तर संतापजनक देखील आहे,अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com