Amabadas Danve News : मुख्यमंत्री शिंदेंची पोच कल्याण, ठाण्याच्या बाहेर नाही; ठाकरेंच्या नेत्याने डिवचले

Shivsena Political News : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांना भाजपमुळे मते मिळाली असल्याचे सांगत त्यांची पोच ठाणे आणि कल्याणच्या बाहेर नसल्याचे सांगत डिवचले आहे.
Ekanath  shinde, Ambadas danve
Ekanath shinde, Ambadas danveSarkarnama
Published on
Updated on

Pune News : शिवसेनेच्या वर्धापन कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सेनेला काँग्रेसची मते मिळाल्यानेच त्यांचे खासदार निवडून आले, अशी टीका केली. यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांना भाजपमुळे मते मिळाली असल्याचे सांगत त्यांची पोच ठाणे आणि कल्याणच्या बाहेर नसल्याचे सांगत डिवचले आहे.

पुण्यात दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळेस अंबादास दानवे (Amabadas Danve) म्हणाले, राज्यामध्ये सध्या उपलब्ध असलेल्या बि-बियाणे, खतांची उपलब्धता, शेतकऱ्यांना होणारा कर्जपुरवठा याबाबत कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी गुरुवारी पुण्यात बैठक झाली. प्रशासन काम करते मात्र सरकारकडून अपेक्षित मदत त्यांना मिळत नाही. त्यामुळे शेतकरी वाऱ्यावर असल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांना बहुतांश ठिकाणी कर्ज पुरवठा हा कारणीभूत ठरत आहे. शेतकऱ्यांवरती बँकांची होत असलेली दादागिरी आणि बोगस बि-बियाणे आणि खतपुरवठा करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. बोगस खतांच्या वितरणवर सरकारचे नियंत्रण नाही. ही सर्व बोगस खत गुजरातमधून महाराष्ट्रात येत आहेत. त्यामध्ये काही यामध्ये काही मोठे व्यापारी सहभागी असण्याची शक्यता आहे.

बोगस बि-बियाणे आणि खत विकणाऱ्यांवरती कडक कारवाई होणे अपेक्षित असून पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवणे आवश्यक आहे, त्याशिवाय शेतकरी आत्महत्या कमी होणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

सरकारकडून फक्त बोल घेवड्याप्रमाणे घोषणा करण्यात येत आहे, प्रत्यक्षात कारवाई मात्र होत नाही. अद्यापही अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. येत्या अधिवेशनात हे सर्व मुद्दे विरोधी पक्ष म्हणून आम्ही लावून धरणार असल्याचं दानवे यांनी सांगितले.

Ekanath  shinde, Ambadas danve
Video Anil Parab News : पदवीधर निवडणुकीच्या मतदारयादीत गोंधळ; अनिल परबांच्या मुलींसह अनेकांचे फॉर्म झाले रिजेक्ट

या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला काँग्रेसमुळे मते मिळाली, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी केला होता. त्याबाबत प्रतिक्रिया देताना दानवे म्हणाले, लोकसभा निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. त्यामुळे आमची मते काँग्रेसला मिळाली आणि काँग्रेसची मते आम्हाला मिळाली आहेत. त्यामुळेच मागील वेळी एक जागा असलेल्या काँग्रेसला यावेळी 13 जागा मिळाल्या तर आमच्याकडे पाच खासदार होते त्याचे आता नऊ झाले असल्याचं दानवे यांनी सांगितले.

रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी लोकसभेला भाजपच्या काही नेत्यांच्या हट्टामुळे आम्हाला कमी जागा मिळाल्याचे सांगितले. मात्र, विधानसभेला आम्ही भाजप एवढ्याच जागा लढू, असे वक्तव्य केले होते. त्याबाबत बोलताना दानवे म्हणाले, भाजपमुळेच आमच्याकडून गेलेल्या गद्दारांच्या जागा आल्या, नाहीतर त्यांची पोच ही ठाणे आणि कल्याणच्या पुढे नसल्याचा घणाघात दानवे यांनी केला.

(Edited By : Sachin Waghmare)

Ekanath  shinde, Ambadas danve
Laxman Hake News : हाकेंच्या घरची चूल चार दिवसांपासून पेटली नाही; मुलाच्या आठवणीने आई-वडिलांचे डोळे पाणावले

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com