जात पडताळणी समितीकडून मनस्ताप : म्हणे कागदपत्रे पावसात भिजली;आता पुन्हा जमा करा

लोकांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या या समितीच्या कार्यालयास नेहमीच अपूर्ण सुविधा असलेल्या जागा कार्यालयासाठी देण्यात येतात.
मंत्रालय
मंत्रालय सरकारनामा
Published on
Updated on

पुणे : पावसाचे पाणी शिरल्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या येरवडा येथील कार्यालयातील कागदपत्रे, संगणकासह साहित्य खराब झाले आहे.त्यामुळे पडताळणीचे प्रस्ताव सादर केलेल्या अर्जदारांनी प्रस्ताव सादर केल्याची पोच आणि त्यासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हा पातळीवर जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे काम या समितीमार्फत करण्यात येते. या समितीचे कार्यालय येरवडा येथे आहे. बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैता प्रमाणपत्र सक्तीचे आहे. शिवाय नोकरी तसेच निवडणुका लढविणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांना या कार्यालयाचे महत्व माहिती आहे.

मंत्रालय
पुण्यात उद्यापासून हॉटेल्स रात्री बारापर्यंत तर दुकाने अकरापर्यंत खुली ठेवण्यास परवानगी

लोकांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या या समितीच्या कार्यालयास नेहमीच अपूर्ण सुविधा असलेल्या जागा कार्यालयासाठी देण्यात येतात.येरवड्यातील अशीच जागा कार्यालयासाठी देण्यात आल्याने पावसात भिंत कोसळून या कार्यालयात शिरलेल्या पाण्यात सर्व कागदपत्रे भिजून गेली. आता सर्व कागदपत्रे व आधीच्या कागदपत्रांची पोच घेऊन येण्याचे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे. सामान्य माणसाच्या दृष्टीने हा मनस्तापाचा विय आहे.

येरवडा परिसरात ९ ऑक्टोबरला सायंकाळी अचानक झालेल्या पावसामुळे समितीच्या कार्यालयातील मागील बाजूची कारागृहाची संरक्षण भिंत कोसळली. त्यामुळे पावसाचे पाणी जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात शिरले. पावसाचे पाणी रात्रभर कार्यालयात साचून राहिल्यामुळे कार्यालयातील जात प्रमाणपत्र पडताळणीचे दस्तावेज, संगणक आणि इतर साहित्य भिजून खराब झाले आहे, असे सांगण्यात येत आहे.

मंत्रालय
आज पुण्यात कोरोनाचे केवळ ११२ नवे रूग्ण

जात पडताळणी समितीच्या कार्यालयातील भिजलेली कागदपत्रे सुकवून, यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीचे चौकशीसाठी समिती कार्यालयात येणाऱ्या अर्जदारांनी प्रस्ताव दिलेली पोच पावती आणि त्यासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह उपस्थित राहावे. एखादा प्रस्ताव कार्यालयात उपलब्ध नसल्यास तो पुन्हा तयार करून समितीमार्फत त्यावर योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आता समितीच्यावतीने सांगण्यात येत आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com