Sharad Pawar : साहेब संधी द्या, डोक्यावर हात ठेवा, आबा बागुलांची शरद पवारांना साद !

Assembly Election 2024 : येत्या निवडणुकीमध्ये प्रत्येक जागा ही महाविकास आघाडीसाठी महत्त्वाची असून पर्वतीची जागा ही काँग्रेसला सोडावी अशी विनंती आम्ही शरद पवार यांच्याकडे केली आहे
Aba Bagul-Sharad Pawar
Aba Bagul-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीतील इच्छुकांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अद्याप जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या नसल्या तरी इच्छुकांनी आपापल्या पातळीवरती मोर्चे बांधणी सुरू केली आहे. आपल्या पक्षाबरोबरच महाविकास आघाडी मधील इतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या देखील भेटीगाठी सध्या इच्छुक घेताना दिसत आहेत.

पर्वती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छुक असलेले माजी उपमहापौर आबा बागुल यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.बागुल म्हणाले,आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

येत्या निवडणुकीमध्ये प्रत्येक जागा ही महाविकास आघाडीसाठी महत्त्वाची असून पर्वतीची जागा ही काँग्रेसला सोडावी अशी विनंती आम्ही पवार साहेबांकडे केली आहे.त्यावर पवार साहेबांनी निवडून येणार सीट असेल तर नक्की याबाबत विचार करू असा आश्वासन शरद पवार यांनी दिलं असल्याचं बागुल यांनी सांगितलं.

Aba Bagul-Sharad Pawar
Sunetra Pawar : पवारांचं निवासस्थान असलेल्या ‘मोदी बागे’त सुनेत्रा पवार कोणाला भेटल्या? अजितदादा गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

शरद पवार (Sharad Pawar) हे राष्ट्रीय नेते असून त्यांचा आणि काँग्रेसचा आशीर्वाद मिळाला तर मी नक्कीच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार होईल असा विश्वास देखील बागुल यांनी व्यक्त केला.पर्वती विधानसभा मतदारसंघात आत्तापर्यंत काँग्रेसने सर्वांना संधी दिली आहे. मला अद्याप तरी संधी मिळालेली नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मला पक्षाने संधी द्यावी अशी माझी विनंती आहे.

Aba Bagul-Sharad Pawar
Video IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकर प्रकरणात पोलिस महासंचालकांनी घातले लक्ष, दिले मोठे निर्देश !

निवडणूक काळामध्ये सर्वच पक्षाच्या इच्छुकांकडून तयारी करण्यात येते. माझी देखील तयारी सुरू असून त्याच दृष्टिकोनातून शरद पवार यांची मी भेट घेतली असून त्यांना विनंती केली आहे. मी पर्वतीमुळे विधानसभा मतदारसंघांमधून निवडून येऊ शकतो गेले 30-40 वर्ष मी काँग्रेसमधून कार्यरत असून काँग्रेसचा (Congress) एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला संधी द्यावी माझ्या डोक्यावरती हात ठेवावा अशी विनंती मी शरद पवार यांना केले असल्याचं बागुल यांनी सांगितलं.

मी पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे. मात्र पक्ष श्रेष्ठींचा निर्णय हा महत्त्वाचा असतो. ते योग्य निर्णय घेतील असा विश्वास आहे. त्यामुळे मी माझ्याकडून सर्वांच्या भेटी घेऊन प्रयत्न आहे. यावेळी शंभर टक्के मला तिकीट एक मिळणार असून माझे स्टार जोरात आहे असा विश्वास आबा बागुल यांनी व्यक्त केला.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com