Ajit Pawar News: अजितदादा आज बारामती पिंजून काढणार; दिवसभरात सात सभा

Baramati Lok Sabha Constituency 2024: शरद पवार यांच्या खेळीमुळे वातावरण शरद पवार गटासाठी पोषक होण्याची शक्यता असल्याने अजित पवारदेखील अॅक्टिव्ह झाले आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency 2024) वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बारामती तालुक्यात सभांचा धडाका लावणार आहेत. ते आज एकाच दिवशी सात सभा घेणार आहेत.

बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार मैदानात उतरले आहेत, तर सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी बारामतीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे बारामतीत सभा, बैठका, मेळाव्यांचा धडाका सुरू झाला आहे. त्यात आता अजित पवार आज बारामती पिंजून काढणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गुरुवारी अजित पवार सुपे, कोऱ्हाळे बुद्रुक, झारगडवाडी, करंजेपूल, माळेगाव बुद्रुक, नीरा वागज व बारामती शहरातील मुक्ताई लॉन्स या ठिकाणी सभा घेऊन आपली भूमिका कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहेत.

Ajit Pawar
Beed Lok Sabha Elections 2024: पंकजाताईंना खासदार करणं धनंजय मुंडेंसाठी महत्त्वाचं ठरणार; जिल्ह्यावर नेतृत्वाची संधी...

दरम्यान, काही दिवसांपूर्वी यांनीदेखील बारामती दौरा करून विविध मेळाव्यांना संबोधित केल्याचे पाहायला मिळालं. बारामतीच्या मैदानात खुद्द शरद पवार उतरल्याने अजित पवार गटांमध्ये कुठेतरी चिंतेचं वातावरण निर्माण झाला आहे. शरद पवार यांच्या खेळीमुळे वातावरण शरद पवार गटासाठी पोषक होण्याची शक्यता असल्याने अजित पवारदेखील बारामतीमध्ये पूर्णपणे अॅक्टिव्ह होताना पाहायला मिळत आहेत.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com