Pune News: माजी मंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसापासून राजकीय वर्तुळात सुरु आहे. हर्षवर्धन पाटलांनी (Harshvardhan Patil) काही दिवसापूर्वी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यानंतर ते इंदापुरातून 'तुतारी'वर लढणार, अशी चर्चा आहे.
इंदापूर (Indapur) तालुक्यातील तुतारीच्या चिन्हावर आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा असलेले उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी आज (ता. 29) शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या गोविंदबाग निवासस्थानी भेट घेतली. आपले म्हणणे सविस्तरपणे मांडले. त्यांनी हर्षवर्धन पाटलांना विरोध केला आहे.
दशरथ माने, अप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, महारुद्र पाटील, अशोक घोगरे, तेजसिंह पाटील, अमोल भिसे,यांच्यासह अनेक मान्यवरांनी पवारांची भेट घेतली. यावेळी हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का? असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी उपस्थितांना स्पष्ट शब्दात उत्तर दिले.
शरद पवार यांच्याकडे इंदापुरातील शिष्टमंडळाने निष्ठावान कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी केली. 'नको माजी नको आजी आम्हाला हवा नवीन बाजी' या शब्दात कार्यकर्त्यांनी पवार यांच्यासमोर भावना व्यक्त केल्या. हर्षवर्धन पाटील यांना तुतारीच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केल्याने पाटील यांच्यापुढे आता अडचणी वाढल्या आहेत.
इंदापूरच्या बाबतीतही सर्वांशी विचारविनिमय करुन मगच निर्णय घेतला जाईल. यंदा इंदापूरमध्ये बदल घडेल असे वातावरण आहे, त्या मुळे निवडून येण्याची क्षमता विचारात घेत सर्वांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय घेऊ, पुढील काही दिवसात आम्ही उमेदवार निश्चित करु, असा शब्द शरद पवार यांनी उपस्थितांना दिला.
महाविकास आघाडीत तीन लोकांना उमेदवार निवडण्याचा अधिकार दिला आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले, शिवसेनेचे संजय राऊत यांना अधिकार देण्यात आलेत. ज्या तालुक्यात इच्छुक आहे त्याचा स्वतंत्र सर्वे करायचा आहे, त्यानंतर इंदापूरचा निर्णय घेण्यात येईल, असे पवारांनी सांगितले. स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच निर्णय घेऊ, असं शरद पवार म्हणालेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.