

Rahuri By-Election : बारामती आणि राहुरी विधानसभेमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. सत्ताधारी पक्षाकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ते बारामतीमध्ये उमेदवार देणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच, राहुरीबाबत शरद पवार निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.
महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक कोणी लढत नसेल तर काँग्रेसने बारामती आणि राहुरीमध्ये निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठी त्यांना दिल्लीतील वरिष्ठांकडून हिरवा कंदिल मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची राष्ट्रवादी बारामतीमध्ये निवडणूक लढणार नसेल तर आम्ही ही निवडणूक लढू, असे सांगितले होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी देखील काँग्रेस नेत्यांची भेट घेत ते येथे निवडणूक लढण्यास तयार असल्याचे सांगितले होते.
राहुरीमध्ये माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, त्याबाबत निर्णय शरद पवार घेणार असल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली होती. त्यामुळे या जागेवर शरद पवारांची राष्ट्रवादी तसेच ठाकरेंची शिवसेना लढणार नसेल तर काँग्रेस येथे उमेदवार देण्यास तयार असल्याचे काँग्रेस नेते सांगत आहेत.
पोटनिवडणुकीत काँग्रेस लढणार असेल तर त्यांना आणखी दोन पक्षांची साथ मिळण्याची शक्यता आहे. जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने ही निवडणूक लढण्याचे समर्थन केले आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून देखील या निवडणुकीत काँग्रेसला साथ मिळण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.