Sharad Pawar News: शरद पवारांच्या उपस्थितीत मोठा निर्णय! शिवनगर संस्थेत पार्थ-युगेंद्र पवारांची नियुक्ती; सुनेत्रा पवार उपाध्यक्षपदी

Parth Pawar appointed at Shivnagar institution: बारामतीतील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या विश्वस्त मंडळावर पार्थ पवार आणि युगेंद्र पवार यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती झाली असून सुनेत्रा पवारांनी उपाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.
Shivnagar Vidya Prasarak Mandal Baramati
Shivnagar Vidya Prasarak Mandal BaramatiSarkarnama
Published on
Updated on

माळेगाव (पुणे): माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या विश्वस्त मंडळावर मानद सदस्य म्हणून पार्थ अजित पवार आणि युगेंद्र श्रीनिवास पवार यांची नियुक्ती करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याशी संलग्न असलेली शिवनगर विद्या प्रसारक मंडळ ही परिसरातील एक महत्त्वाची शैक्षणिक संस्था असून, तिचे अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे आहे. संस्थेच्या पोटनियमानुसार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांकडे शिवनगर संस्थेचे उपाध्यक्षपद सोपविण्याची तरतूद आहे. त्यानुसार माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.

याच बैठकीत विश्वस्त मंडळावर मानद सदस्य म्हणून पार्थ अजित पवार आणि युगेंद्र श्रीनिवास पवार यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. या निर्णयामुळे संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक व विकासात्मक उपक्रमांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Shivnagar Vidya Prasarak Mandal Baramati
Sharad Pawar NCP: शरद पवार पक्षाची पिंपरी-चिंचवड कार्यकारिणी बरखास्त! अमोल कोल्हेंच्या प्लॅननुसार नव्या चेहऱ्यांना संधी

बैठकीस विश्वस्त अॅड. राजेंद्र काटे, धन्यकुमार जगताप, विराज खलाटे, प्रवीण पोंदकुळे, डॉ. मोहन नेवसे, रोहन देवकाते, सचिव डॉ. धनंजय ठोंबरे तसेच निमंत्रित सदस्य गणपतराव देवकाते व अशाताई जराड उपस्थित होते.

पार्थ पवार आणि युगेंद्र पवार यांच्या सहभागामुळे संस्थेच्या विकासाला नवी दिशा मिळेल, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अधिक प्रभावी उपक्रम राबविण्यास चालना मिळेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com