Sharad Pawar NCP: शरद पवार पक्षाची पिंपरी-चिंचवड कार्यकारिणी बरखास्त! अमोल कोल्हेंच्या प्लॅननुसार नव्या चेहऱ्यांना संधी

NCP Pimpri Chinchwad: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पिंपरी-चिंचवड शहर व जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या कार्यकारिणीत तरुण आणि अनुभवी कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे.
Dr. Amol Kolhe
Dr. Amol Kolhesarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पिंपरी-चिंचवड शहरात अखेर मोठा फेरबदल केला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्याची संपूर्ण कार्यकारिणी तात्काळ प्रभावाने बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी देत 'भाकरी फिरवणार' असल्याचे सांगितले जात आहेत.

बैठकीत झाला मोठा निर्णय

पुणे येथे नुकतीच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पिंपरी-चिंचवडमधील पक्षाच्या सद्यस्थितीवर आणि संघटनात्मक बांधणीवर सविस्तर खल झाला. या चर्चेअंती जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नव्या दमाची फळी निर्माण करण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्षांनी घेतला. पक्षाने याबाबतचे अधिकृत पत्रही प्रसिद्ध केले आहे.

सुनील माने यांच्या खांद्यावर धुरा

पिंपरी-चिंचवड शहर व जिल्ह्याची नवीन, मजबूत कार्यकारिणी तयार करण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पक्षाचे निरीक्षक सुनील माने यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी सल्लामसलत करून, तसेच शहरातील आजी-माजी पदाधिकारी व निष्ठावंतांशी चर्चा करून नवी कार्यकारिणी गठित करण्याचे आदेश माने यांना देण्यात आले आहेत.

Dr. Amol Kolhe
Bike Taxi Policy : बाहेरच्यांना नो एंट्री! बाईक टॅक्सीसाठी राज्य सरकारचे 'ओन्ली महाराष्ट्र' धोरण; मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा

जुने-नवे आणि सोशल बॅलन्स राखणार!

नव्या कार्यकारिणीच्या रचनेबाबत बोलताना निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले की, नवीन कार्यकारिणीत महिला, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक, ओबीसी आणि इतर सर्व संवर्गातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार योग्य प्रतिनिधित्व दिले जाईल. पक्षात प्रदीर्घ काळ काम करणारे ज्येष्ठ नेते आणि उत्साही तरुण कार्यकर्ते यांचा सुवर्णमध्य साधत ही नवी टीम तयार केली जाईल.

Dr. Amol Kolhe
Lohagad Murder Case : केतनच्या हत्येपूर्वी सियाकडून देशभरात गाजलेल्या 'हनिमून मर्डर केस'चा अभ्यास; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

अमोल कोल्हेंच्या मार्गदर्शनात होणार बांधणी

शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघ आणि प्रभागांमधील प्रमुख पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला जाईल. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनानुसार, जे कार्यकर्ते पक्षाच्या कार्यक्रमात, आंदोलनात आणि जनसंपर्कात सातत्याने सक्रिय राहिले आहेत, त्यांनाच या नवीन कार्यकारिणीत मानाचे स्थान मिळणार असल्याचे सुनील माने यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com