Ajit Pawar Death: अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत पहिला मोठा निर्णय

Baramati Successor News : आपल्या राजकीय जीवनाचा प्रवास अजित पवार यांनी बारामतीतील याच खरेदी विक्री संघाच्या कार्यालयातून केला होता.
First major decision in Baramati after Ajit Pawar's demise
First major decision in Baramati after Ajit Pawar's demiseSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Tribute: बारामती येथील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य व शेतकऱ्यांचा कणा असलेल्या बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या संचालक मंडळाने आज संस्थेच्या नामांतराचा ऐतिहासिक निर्णय घेतला. आज झालेल्या संचालक मंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत संस्थेचे नामांतर करून ‘अजितदादा पवार बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ’ असे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय एकमताने घेण्यात आला.

संघाचे अध्यक्ष अँड. रवींद्र माने, उपाध्यक्ष नितीन देवकाते, व्यवस्थापक नीलेश लोणकर यांच्यासह संचालक मंडळाने या बाबत माहिती दिली. बारामती तालुक्यातील सहकार व कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान देणारे अजित पवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संचालक मंडळाकडून देण्यात आली.

आपल्या राजकीय जीवनाचा प्रवास अजित पवार यांनी बारामतीतील याच खरेदी विक्री संघाच्या कार्यालयातून केला होता. या कार्यालयात सुरवातीला बसून अजित पवार स्थानिकांचे प्रश्न सोडवत असत. अजितदादांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात सहकार क्षेत्रातूनच केली. त्यांच्या नेतृत्वाखाली बारामतीतील सहकारी संस्थांनी केवळ राज्यातच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरही वेगळी ओळख निर्माण केली आहे.

First major decision in Baramati after Ajit Pawar's demise
Sanjay Jadhav Shiv Sena: बाबाजानी दुर्राणींमुळे 'झेडपी'त वाट बिकट; ठाकरेंच्या शिलेदाराने डागली तोफ...

अजितदादांनी या संस्थांच्या वार्षिक सभांना उपस्थित राहून वेळोवेळी कामकाजाचा आढावा घेतला असून, बदलत्या काळात टिकून राहण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या दूरदृष्टीतूनच खरेदी-विक्री संघाचे कामकाज अधिक पारदर्शक व आधुनिक झाले आहे. त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी नामांतराचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.

First major decision in Baramati after Ajit Pawar's demise
Shiv Sena news : एक नगरसेवक असूनही उपमहापौरपद, माजी आमदाराचे पुत्र भडकले; शिंदेसेना अडगळीत जाण्याची भीती...

दरम्यान, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज) या संघाचेही अजितदादा पवार ‘पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज’ असे नामकरण करण्याचा निर्णय दूध संघाच्या संचालक मंडळाने सोमवारीच घेतला आहे. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडचे नामकरणे अजितनगर करावे, लाडकी बहीण योजनेला अजितदादांचे नाव देण्याची मागणीही आता पुढे आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com