पुणे : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी इस्लाम धर्माबद्दल आणि मुस्लिमांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. इस्लाम हाच देशाचा खरा शत्रू असल्याचे सांगत जुन्या गोष्टी विसरून पुढे जाण्याची वृत्ती देशातल्या सुशिक्षितांमध्ये असल्याची टीका त्यांनी केली आहे. भिडे यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे व्यक्त करण्यात येत आहे.
भिडे पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, "औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केवळ इस्लामच्या पोटतिकडीतून केली. छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ज्यामुळे झाली तो इस्लाम आपल्या देशाचा खरा शत्रू आहे. औरंगजेब आणि संभाजी ही दोन माणसं होती. त्यांचे एकमेकांशी वैर होते म्हणून औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारलं नाही तर कन्याकुमारी ते काश्मीर असा देश तुकडे-तुकडे करुन हिंदू धर्म आणि हिंदू समाज संपवून टाकावा अशी त्यामागची औरंगजेबाची भावना होती."
छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहणे ही प्रत्येकाची जबाबदारी तर आहेच. मात्र, प्रखर राष्ट्राभिमान उत्पन्न करणारी गोष्टदेखील आहे.एक दिवस असा उजाडावा की झालेल्या बलिदानाचा सूड घेणारा हिंदुस्तान उभा राहावा, अशी अपेक्षा भिडे यांनी व्यक्त केली आहे.भिडे यांनी या आधीही विविध वादग्रस्त विधाने करुन वाद ओढावून घेतले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.