Kasaba By-Election : कसब्याच्या रंणागणांत बिचुकलेंची एन्ट्री; बिचुकलेंच्या पत्नीने अर्ज नेला

Abhijit Bichukale : कसबा पोटनिवडणुकीच्या रंणागणांत अभिजित बिचुकलेही दिसणार
Abhijit Bichukale
Abhijit Bichukale Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Kasaba Politics: कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही जागा लढविण्याठी सर्व पक्षातील नेत्यांसह अनेक कार्यकर्तेही इच्छुक आहेत. सर्वच पक्षातून उमेदवारी मिळण्यासाठी अनेकांची रस्सीखेच सुरू आहे.

यातच आता या पोटनिवडणुकीमध्ये अभिनेता अभिजित बिचुकले यांची एन्ट्री झाली आहे. अभिजित बिचुकले यांच्या पत्नी अलकृंता बिचुकले यांनी अर्ज घेतला आहे. त्यामुळे आता कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या रंणागणांत बिचुकलेही दिसणार आहेत.

Abhijit Bichukale
Congress News : काँग्रेसचा एक उमेदवार गेला; पण दोन मतदार संघ आणले खेचून : भाजपचे चाणक्य फेल

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारीबाबत अद्याप कोणत्याच पक्षाने आपला अधिकृत उमेदवार घोषित केलेला नाही. मात्र, उमेदवारीबाबत फक्त चर्चा सुरु आहे. तर अनेक इच्छुकांनी अर्ज देखील नेले आहेत. यामध्ये शिवसेनेतील संजय मोरे, विशाल धनवडे तर वंचित बहुजन आघाडीचे भेंगडे यांनी अर्ज नेले आहेत.

Abhijit Bichukale
Satara : बाळासाहेबांची शिवसेना, भाजप एकत्र बसून पराभवाची कारणे शोधणार : शंभूराज देसाई

तसेच भाजपचे शैलेश टिळक यांनीही या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज नेला आहे. तसेच कौस्तुभ गुजर, नलावडे यांनीही उमेदवारी अर्ज नेले आहेत. मात्र, अद्याप कोणत्याच पक्षाने आपला अधिकृत उमेदावार घोषित केलेला नाही.

दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीत (Kasaba by-election) काँग्रेसकडून सोळा तर राष्ट्रवादीकडून बाराजण इच्छुक आहेत. तसेच ही निवडणूक मनसे देखील लढविण्याची शक्यता आहे.

Abhijit Bichukale
Amravati Graduate Election : रणजीत पाटलांनी धुळीस मिळवली देवेंद्र फडणवीसांची प्रतिष्ठा !

तसेच भाजप (BJP) आपला उमेदवार घोषीत करण्याच्या हालचाली करत आहे. या पार्श्वभूमीवरच आज भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजप-शिंदे गटात एक महत्त्वाची गुप्त बैठक पार पडल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच या बैठकीत कसबा आणि चिंचवड विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारांबाबत चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार असणार? हे येत्या दोन-तीन दिवसांत स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com