Chinchwad News : भाजपला मोठा धक्का! चिंचवड प्रचाराच्या ऐन धामधुमीत माजी नगरसेवकाने पक्ष सोडला

Chinchwad BJP : ...अखेर भाजपच्या पिंपरी-चिंचवडमधील नाराज नगरसेवक कामठेंचा राजीनामा
Tushar Kamthe and BJP
Tushar Kamthe and BJP Sarkarnama
Published on: 
Updated on: 

पिंपरी : चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजपच्या प्रचाराला नुकताच कुठे जोर भरू लागला होता. त्यात आज अचानक चिंचवड मतदारसंघातील पक्षाचे माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी पक्ष सोडल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

भाजप सोडल्यानंतरची पुढची भुमिका काय, कुठल्या पक्षात जाणार असे विचारले असता त्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत जाहीर करणार असल्याचे कामठे यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. भ्रष्टाचाराविरुद्धच्या आपल्या संघर्षाला साथ न दिल्याने पक्ष सोडला असल्याचे त्यांनी सांगितले.

Tushar Kamthe and BJP
Kasba By- Election : कसब्यात भाजपची धाकधूक वाढली; ऐनवेळी खासदार बापटांची प्रचारातून माघार

२०१७ ला पिंपळे निलखमधून (प्रभाग क्र.२६) ते प्रथमच निवडून आले होते. तेव्हापासून त्यांनी महापालिकेत विविध पातळ्यांवर सुरु असलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली होती. त्यासाठी त्यांनी पालिकेत सत्तेत असलेल्या आपल्याच पक्षाला व शहर कारभारी दोन्ही आमदारांना (भोसरीचे महेश लांडगे आणि चिंचवडचे लक्ष्मण जगताप) शिंगावर घेण्याचे धाडस केले होते.

मात्र, त्यांच्या या लढाईला पक्षाने स्थानिकच नाही,तर राज्य पातळीवरूनही पाठिंबा न दिल्याने त्यांनी गेल्यावर्षी नगरसेवकपदाची टर्म संपायला १६ दिवस बाकी असताना २४ फेब्रुवारीला नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.

Tushar Kamthe and BJP
Nana Patole : नाना माझं ऐकतात; असं म्हणत ‘बिहाईंड त सीन’ काय घडलं, हे अशोकरावांनी सांगितलं !

तो देताना त्यांनी पक्षाचे स्थानिक नेते हे ठेकेदार असून त्यांच्या भ्रष्टाचाराला, हुकूमशाहीला कंटाळून राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. त्यावेळीच ते पक्ष सोडणार आणि राष्ट्रवादी जाणार अशी जोरात चर्चा होती. कारण त्यांच्याअगोदर नगरसेवकपदाचा राजीनामा दिलेले भाजप नगरसेवक वसंत बोराटे आणि चंदा लोखंडे यांनी हातावर घड्याळ बांधले होते.

मात्र, कामठे हे योग्य वेळेची तथा राजकीय स्थित्यंतराची नेमकी वाट पाहत होते. चिंचवड पोटनिवडणुकीच्या निर्णायक क्षणी त्यांनी भाजपला रामराम ठोकण्याची खेळी केली आहे. त्याचा किती विपरित परिणाम पक्षावर होणार हे २ मार्चला मतमोजणीनंतर दिसणार आहे.

Tushar Kamthe and BJP
Aurangabad News : महाविकास आघाडीचा जोर, ठाकरेंची शिवसेनाही जिल्ह्यात कमबॅक करणार..

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना गेल्यावर्षी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून गळती सुरु झाली होती. दुसरीकडे या निवडणुकीची तयारी प्रशासनाने सुरु केली होती. प्रभाग रचना जाहीर झाल्याने आऊटगोईंग, इनकमिंग जोरात सुरु झाले होते. भाजपचे नगरसेवक राजीनामा देऊ लागले होते.

वीसेक ते देण्याच्या तयारीत असून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा त्यावेळचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी केला होता. तो खराही ठरला असता. पण जुनमध्ये राज्यात अचानक सत्तांतर होऊन भाजप सत्तेत आल्याने त्यांच्या पिंपरी-चिंचवडमधील गळतीला करकचून ब्रेक लागला.

म्हणूनच की काय २४ फेब्रुवारी २०२२ ला नगरसेवकपदाचा राजीनामा देऊनही कामठे यांनी पक्ष मात्र सोडला नव्हता. आता जवळजवळ वर्षभराने १५ फेब्रुवारी २०२३ ला निर्णायक क्षणी त्यांनी तो सोडला आहे.

Tushar Kamthe and BJP
Satara : नवीन उद्योगांसह रोजगार निर्मिती होणार; शिवेंद्रसिंहराजेंची उद्योग मंत्र्यांशी चर्चा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) हे चिंचवड पोटनिवडणुकीतील पक्षाच्या उमेदवार आणि या मतदारसंघातील पक्षाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी उद्या येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज त्यांना कामठे यांनी आपला पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा मेल केला.

तो मंजूर करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. त्याची प्रत त्यांनी पक्षाचे शहराध्यक्ष भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना दिली. यामुळे मोक्याच्या क्षणी भाजपला चिंचवडमध्ये जोरदार फटका बसला आहे. दरम्यान, राजीनामा देऊन काही वेळच झाला असल्याने तो स्वीकारला की नाही, हे लगेचच कळू शकलेले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com