BJP campaign Pune: भाजपने पुण्यातच जोर लावला; बड्या नेत्यांना पायघड्या; अजितदादांचा पहिल्यांदाच पलटवार

Ajit Pawar counterattack News : अजित पवार यांनी देखील खिंड लढवण्यास सुरुवात केली असून भाजपमधील नेत्यांना आपल्याकडे घेण्यास सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळत आहे.
Ajit Pawar & Devendra Fadanvis
Ajit Pawar & Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून मिशन बारामती भाजपने चांगलंच मनावर घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला मतदारसंघातील मोठमोठे नेते आपल्याकडे घेतल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर भाजपने स्थानिक नेत्यांना देखील पक्षात घेण्यास सुरुवात केली आहे. आता अजित पवार यांनी देखील खिंड लढवण्यास सुरुवात केली असून भाजपमधील नेत्यांना आपल्याकडे घेण्यास सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुणे जिल्ह्यात भाजप समोर सर्वात मोठं आव्हान हे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या राष्ट्रवादीचा असणार आहे. याच दृष्टिकोनातून भाजपने गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्ह्यातील आपली ताकद वाढवलेली आहे.

Ajit Pawar & Devendra Fadanvis
Eknath Shinde: "लय देवानं परेशान केलंय...." धाराशिवच्या शेतकऱ्यांची हतबलता! पुराच्या पाहणीसाठी गेलेल्या एकनाथ शिंदेंना शेतकऱ्यांनी घेरलं

या अंतर्गतच सर्वप्रथम इंदापूर येथे भाजपने (BJP)अपक्ष विधानसभा निवडणूक लढलेल्या प्रवीण माने यांना पक्षात घेतले. त्यानंतर भोर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार संग्राम थोपटे तसेच पुरंदर विधानसभा मतदारसंघातून संजय जगताप पक्षात घेण्यात आले. त्यासोबतच मावळ विधानसभा मतदारसंघातून देखील सुनील शेळके यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवलेले बापू भेगडे यांच्या प्रवेश भाजपने निश्चित केला होता. मात्र, तो आता काही कारणास्तव लांबणीवर पडला आहे.

Ajit Pawar & Devendra Fadanvis
Eknath Shinde: "लय देवानं परेशान केलंय...." धाराशिवच्या शेतकऱ्यांची हतबलता! पुराच्या पाहणीसाठी गेलेल्या एकनाथ शिंदेंना शेतकऱ्यांनी घेरलं

भाजपची पुणे जिल्ह्यातील वाढती ताकद ही अजित पवारांना खिंडीत पकडण्यासाठी असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच आता अजित पवार यांनी पुरंदर तालुक्यातील भाजपामध्ये असलेल्या एका मोठ्या नेत्याला आपल्या पक्षात घेण्याचे निश्चित केले आहे.

Ajit Pawar & Devendra Fadanvis
Tanaji Sawant : पुरग्रस्तांच्या मदत किटवर नेत्यांचे फोटो का? शिंदेंची बाजू सावरण्यासाठी तानाजी सावंतांची धडपड, मंत्रिपद फिक्स झाले?

पुरंदर तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात हा प्रवेश होणार असल्याचं जालिंदर कामठे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपाला धक्का मानला जात आहे.

Ajit Pawar & Devendra Fadanvis
Ajit Pawar NCP : चिंतन शिबीर आटोपताच अजित पवारांना धक्का; जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा  

जालिंदर कामटे हे पुरंदर तालुक्यात अतिशय प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात चार वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापूर्वी ते राष्ट्रवादीमध्ये होते ज्यावेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा ते स्वगृही परतणार आहेत.

Ajit Pawar & Devendra Fadanvis
Ajit Dada Chintan: अजितदादांच्या चिंतनाची हवा दोन दिवसांतच निघाली... विदर्भातील दुसऱ्या जिल्हाध्यक्षाचा राजीनामा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com