
Mumbai News : भारतीय जनता पक्षाने मंगळवारी राज्यातील 78 पैकी 58 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्ती जाहीर केल्या आहेत. उर्वरित 20 जिल्हाध्यक्ष अंतर्गत स्पर्धा आणि राजकीय रस्सीखेच यामुळे लटकल्या आहेत. या नियुक्त्या करताना पक्षाने सदस्य नोंदणी हा निकष लावला जात आहे. पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये जिल्हाध्यक्षपदाची निवड करताना भाजपकडून सावध पावले उचलली जात आहेत. या पदासाठी चौघेजण इच्छुक आहेत.
जुलै 2023 मध्ये मावळ जिल्हाध्यक्षपदी शरद बुट्टे पाटील आणि बारामतीच्या जिल्हाध्यक्षपदी वासुदेव काळे या दोघांची निवड केली होती. मात्र, मंगळवारी केवळ मावळच्या अध्यक्षाची निवड झाली असून, बारामतीला प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. काही तांत्रिक कारणांमुळे निवड जाहीर करण्यात आली नसून, पुढील काही दिवसांत जाहीर होणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. मात्र, बारामतीच्या जिल्हाध्यक्षपदाच्या नावावर एकमत झाले नसल्याचे सांगितले जात आहे.
बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रमुख नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे भाजप येथे अधिक बळकट व्हायचे असेल, तर नेतृत्व निवडीबाबत अचूक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. चुकीच्या निर्णयामुळे पक्षाची प्रतिमा आणि संघटनात्मक ताकद दोन्ही कमकुवत होऊ शकते. त्यामुळे भाजपने जाहीर केलेल्या यादीत बारामतीच्या जिल्हाध्यक्षांची घोषणा करण्यात आली नसल्याचे समजते.
बारामतीमध्ये जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीबाबत भाजपने (BJP) सध्या सावध पवित्रा घेतला आहे. विशेषतः या पदासाठी कोणाचे नाव घोषित करावे, यावर पक्षामध्ये एकमत होत नाही. त्यामुळे अंतर्गत चर्चा वाढल्या आहेत आणि स्थानिक पातळीवर नेतृत्व ठरवताना भाजपची अडचण होत आहे.
गटबाजी आणि स्थानिक मतभेद:
या ठिकाणी पक्ष निरीक्षक म्हणून अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुलाखती घेतल्या आहेत.भाजपमध्ये बारामतीसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघात वेगवेगळ्या गटांमध्ये नेतृत्वाचे स्पर्धात्मक वातावरण आहे. त्यामुळे कोणत्याही एका नावावर सर्वसंमती मिळवणे कठीण ठरत आहे. या पदासाठी जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, किरण दगडे, स्नेहल दगडे व जालिंदर कामटे हे चौघेजण इच्छुक आहेत. या चार जणापैकी एकाच्या नावाची घोषणा होणार आहे.
वरिष्ठ पातळीवरून तोडगा काढण्याचे प्रयत्न
बारामतीमध्ये जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीबाबत सध्या पक्षपातळीवर चर्चा सुरू असून, वरिष्ठ पातळीवरून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. भाजपची पुढील वाटचाल ही बारामतीचा जिल्हाध्यक्ष कोण होतो? यावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.