BJP Pune News: सोशल मीडियावर ट्रोल झाल्यावर उदय जोशी म्हणतात, "मी कुणाचा एक रुपयाही बुडविणार नाही..!

Pune Politics : श्रीराम गॅस एजन्सी अडचणीत आल्याने पैसे देण्यास उशीर झाला आहे, असे जोशी यांनी म्हटलं आहे.
 fraud News
fraud News Sarkarnama
Published on
Updated on

Pune : पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी आणि त्यांचा मुलगा मयूरेश यांच्यावर आर्थिक फसवणुकीची तक्रार नुकतीच दाखल झाली आहे. "आमच्या कुटुंबीयांसोबत ज्या व्यक्तींचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. त्या सर्वांचे आम्ही पूर्ण पैसे देऊ," असे उदय जोशींनी स्पष्ट केले आहे.

उदय जोशी आणि मयूरेश जोशी यांनी श्रीराम गॅस एजन्सीच्या माध्यमातून काही जणांची फसवणूक केल्याची तक्रार मंगेश खरे यांनी केली आहे. त्यांच्यासह आठ ते नऊ जणांची तक्रार दाखल केली आहे. हा विषय सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर उदय जोशींना पत्राद्वारे खुलासा केला आहे.

 fraud News
Chandrashekhar Bawankule News : बावनकुळेंच्या विधानावर पटोले भडकले; म्हणाले, 'येड्या सरकारचे लोकप्रतिनिधी पत्रकारितेला खरेदी करू पाहत...'

"जोशी कुटुंबीयांचे काही आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यास विलंब झाल्याने माझ्या एका आर्थिक हितसंबंधित व्यक्तीने आमच्यावर काही आरोप केले आहेत. त्यांचे आम्ही पुराव्यानिशी उत्तर देऊ. आमचे ज्या व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार झाले आहेत. त्या सर्वांना आम्ही पूर्ण पैसे देऊ. आमची श्रीराम गॅस एजन्सी अडचणीत आल्याने पैसे देण्यास उशीर झाला आहे, असे जोशी यांनी म्हटलं आहे.

"आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला आणि माझ्या पक्षाला फसवायचा हा डाव आहे. माझी प्रतिमा खालविण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे. माझ्याशी आर्थिक हितसंबंध असणाऱ्यांना विनंती आहे की, जोशी परिवार आपल्याशी झालेल्या पूर्ण व्यवहाराला बांधील आहे, लवकरच हे व्यवहार पूर्ण करणार आहोत, असे उदय जोशी यांनी पत्रात म्हटलं आहे.

 fraud News
BJP Pune News: भाजपच्या माजी नगरसेवकाने पुणेकरांना घातला २५ कोटींचा गंडा? काय आहे प्रकार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com