

Pune : पुण्यातील मंतरवाडी दिवेघाटमार्गे सासवड पालखी मार्ग रस्ता खुपच अरुंद आहे. अशीच स्थिती खडी मशिन चौकातून बोपदेव घाट मार्गे भिवरी, सासवडला जाणाऱ्या रस्त्याची आहे. त्यामुळे या दोन्ही रस्त्यांचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. तसेच बोपदेव घाटातून जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाबरोबरच बोपदेव घाटात कात्रजच्या धर्तीवर बोगद्यांची निर्मिती करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली आहे.
पुण्यातील मंतरवाडीपासून दिवेघाटमार्गे सासवडला जाणाऱ्या पालखी मार्गाचे रुंदीकरण करावे आणि खडी मशिन चौकातून बोपदेव घाट मार्गे सासवडला जाणाऱ्या रस्त्याचे सहा पदरीकरण करावे अशी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांच्याकडे केली.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे गुरुवारी (दि.२९) एका कार्यक्रमानिमित्त सासवड दौऱ्यावर आले होते. यावेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी या मागणीसाठी त्यांची भेट घेतली आणि या दोन्ही रस्त्यांच्या रुंदीकरणाबाबत चर्चा करत त्यांना निवेदन दिले. या दोन्ही रस्त्यांच्या कामांबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल असं आश्वासन गडकरी यांनी यावेळी कामठे यांना दिले.
सध्या मंतरवाडी दिवेघाट मार्गे सासवड पालखी मार्ग रस्ता खुपच अरुंद आहे. अशीच स्थिती खडी मशिन चौकातून बोपदेव घाट मार्गे भिवरी, सासवडला जाणाऱ्या रस्त्याची आहे. त्यामुळे या दोन्ही रस्त्यांचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. तसेच बोपदेव घाटातून जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाबरोबरच बोपदेव घाटात कात्रज(Katraj) च्या धर्तीवर बोगद्यांची निर्मिती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बोपदेव घाट, भिवरीमार्गे सासवडला जाणारा २२ किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. हा संपूर्ण रस्ता अरुंद असून, या रस्त्यावर सातत्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ लागली आहे.
कोंढवा बुद्रूक येथील खडी मशिन चौक ते कात्रज मार्गे मुंबईला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. शिवाय हा रस्ता नीरा, फलटण, बारामती, या मार्गाला जोडणारा आहे, असे कामठे यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी माजी आमदार अशोक टेकावडे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वीच जालिंदर कामठे(Jalinder Kamthe) यांनी याच मागणीसाठी राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेत निवेदन दिले होते. खडी मशिन चौकातून सासवडकडे जाणाऱ्या रस्त्यावर बोपदेव घाटाबरोबरच भिवरी, हिवरे, सासवड ही गावे आहेत. त्यामुळे या गावांमधील आणि सासवड येथील नागरिक या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात. सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी खुपच अरुंद पडू लागला आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.