Yogesh Tilekar : कचरा प्रकल्पात मोठा घोटाळा? भाजप आमदाराचा हात आणि फडणवीसांची साथ काँग्रेसचा गंभीर आरोप

Congress allegation against yogesh tilekar: कचरा प्रकल्पात मोठ्या घोटाळ्याचा काँग्रेसचा आरोप. भाजप आमदार आणि फडणवीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.
Yogesh Tilekar garbage project scam allegation
Yogesh Tilekar garbage project scam allegationSarkarnama
Published on
Updated on

Yogesh tilekar controversy latest news: पुणे महानगरपालिकेतील कचरा व्यवस्थापन प्रकल्प भ्रष्टाचाराचे केंद्र बनला असून, भाजप आमदार टिळेकर यांच्या नातेवाईकांच्या 'भूमी ग्रीन' कंपनीला विना निविदा मोठा ठेका देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हस्तक्षेप केल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

स्थायीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत महापालिका क्षेत्रातील कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या एका कंपनीला काम देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला. त्यास स्थायी समितीमधील विरोधी पक्षातील सदस्यांनी विरोध केला. त्यानंतर आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Yogesh Tilekar garbage project scam allegation
Iran war : इराणचा जगातील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर हल्ला; युध्दाला गंभीर वळण, भारतावर काय परिणाम होणार?

शहरात दररोज १००० ते ११०० मेट्रिक टन ओला कचरा निर्माण होत असताना, विविध कंपन्यांना मिळून १७७५ मेट्रिक टन क्षमतेच्या प्रकल्पचे काम दिले गेले आहे, त्यात 'भूमी ग्रीन' कंपनीला देखील त्यातील मोठ्या प्रमाणात काम मिळाले आहे. प्रत्यक्ष कचरा कमी असतानाही जादा क्षमतेच्या प्रकल्पांद्वारे बिले उचलून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

गेल्या चार वर्षांत 'भूमी ग्रीन'ने एका प्रकल्पातूनच पालिकेकडून १९ कोटी रुपये घेतले असून, दीर्घकालीन करारांमुळे पुढील २०-३० वर्षांत पुणे महानगरपालिकेवर ७०० ते ७५० कोटींचा आर्थिक बोजा पडू शकतो, असा दावा शिंदे यांनी केला आहे. तसेच रस्त्यांवर अजूनही कचरा पडून राहत असताना एवढा मोठा खर्च संशयास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

शिंदे यांनी पुढे सांगितले की, यापूर्वी देखील कचरा प्रक्रिये बाबत ९७० रुपये प्रति मेट्रिक टन दराने निविदा काढण्यात आली होती. मात्र दर अधिक असल्याबाबत तक्रारीनंतर स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवण्यात आली त्यानंतर हा दर ५५० रुपयांपर्यंत खाली आला होता. आता पुन्हा जास्त दराने आणि विना निविदा प्रस्ताव पुढे येत असल्याने मोठा घोटाळा होण्याचा संशय वाढला आहे असं काँग्रेसचे म्हणणं आहे.

Yogesh Tilekar garbage project scam allegation
HDFC Bank : देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेत खळबळ; निवृत्त केंद्रीय अर्थ सचिवांचा तडकाफडकी राजीनामा, केले गंभीर आरोप

तसेच कचरा प्रकल्पांमधील अनियमिततेवरून सत्ताधारी आणि मागील सर्व काळातील प्रकल्पांचे स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे मात्र त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता या कंपनीला विना निविदा काम दिले जाऊ नये तसेच झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com