HDFC Bank : देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेत खळबळ; निवृत्त केंद्रीय अर्थ सचिवांचा तडकाफडकी राजीनामा, केले गंभीर आरोप

HDFC Bank chairman Atanu Chakraborty resignation : अतनु चक्रवर्ती यांच्या राजीनाम्यानंतर बँकेने ज्येष्ठ बँकिंग तज्ञ केकी मिस्त्री यांची हंगामी अर्धवेळ चेअरमन म्हणून नियुक्ती केली आहे.
HDFC Bank chairman Atanu Chakraborty
HDFC Bank chairman Atanu ChakrabortySarkarnama
Published on
Updated on

HDFC Bank Chairman Atanu Chakraborty Resigns : देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या एचडीएफसी बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक अतनु चक्रवर्ती यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

राजीनामा देताना अतनु चक्रवर्ती यांनी मागील दोन वर्षांत बँकेत अंतर्गत काही अशा घडामोडी आणि कामकाजाच्या पद्धती पाहायला मिळाल्या, ज्या माझ्या वैयक्तिक मूल्यांशी आणि नैतिकतेशी सुसंगत नव्हत्या. याच कारणामुळे हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.

राजीनामा पत्रात अतनु चक्रवर्ती यांनी म्हटलं की, "बँकेत अशा काही अंतर्गत गोष्टी घडत आहेत ज्या माझ्या नैतिक तत्त्वांच्या विरोधात आहेत. त्यामुळे, या पदावर पुढेही कार्यरत राहणे मला योग्य वाटत नाही."

HDFC Bank chairman Atanu Chakraborty
BHAVYA Scheme : मोदी सरकारकडून ‘भव्य’ योजनेची घोषणा; तब्बल 33 हजार 660 कोटींचे बजेट, तुम्हाला होणार का फायदा? वाचा सविस्तर...

तर अतनु चक्रवर्ती यांच्या राजीनाम्यानंतर बँकेने ज्येष्ठ बँकिंग तज्ञ केकी मिस्त्री यांची हंगामी अर्धवेळ चेअरमन म्हणून नियुक्ती केली आहे. या निर्णयाला भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मंजुरी दिली आहे. मात्र, या राजीनाम्याच्या बातमीमुळे आज शेअर बाजारात एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

HDFC Bank chairman Atanu Chakraborty
Congress News : काँग्रेसला मोठा धक्का! राजीनामा दिलेल्या खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश

आज सकाळी शेअर बाजार उघडताच एचडीएफसीचा शेअर 37.25 रुपयांनी (4.42%) घसरून 805.80 रुपयांवर आला आहे. तर अतनु चक्रवर्ती हे गुजरात केडरचे माजी आयएएस अधिकारी असून त्यांनी अर्थ मंत्रालयात सचिव म्हणून काम केलं आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे बँकेच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असून गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com