Maharashtra BJP Convention : मला माफ करा म्हणत देवेंद्र फडणवीसांनी आमदार, खासदारांचेही कान टोचले!

Devendra Fadnavis Speech : भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने आहेत की, सर्वांनी रोज एक जरी पोस्ट केली तरी फेक नेरटिव्ह संपून जाईल. पण, दुर्दैवाने आज आमचे लोकप्रतिनिधीही पोस्ट करत नाहीत.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune, 21 July : भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने आहेत की, सर्वांनी रोज एक जरी पोस्ट केली तरी फेक नेरटिव्ह संपून जाईल. पण, दुर्दैवाने आज मोकळेपणाने बोलतो, मला माफ करा. पण, आमचे लोकप्रतिनिधीही पोस्ट करत नाहीत. आपल्या लोकप्रतिनिधींची हॅंडल बघा, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कान टोचले.

पुण्यात प्रदेश भाजपचे अधिवेशन (BJP Convention) सुरू आहे. त्या अधिवेशनात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आमदार, खासदारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना फेक नरेटिव्हला उत्तर देण्याबाबतचे आवाहन केले. फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी फेक नरेटिव्हच्या विरोधातील टेक्नॉलॉजीची लढाई लढण्यात आपण कमी पडलो, असे सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज ज्या प्रकारच्या लढाईला आपण सामोरे जात आहोत. त्यांनी महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीवेळी फेक नरेटिव्ह केलं, त्यावेळी आम्ही बेसावध होतो. पण, मी तुम्हाला एवढं सांगतो की, आता तेवढ्याच्या ताकदीची तयारी आपणही केली आहे. आता चिंता करायचं कारण नाही. फेक नेरेटिव्हल थेट नरेटिव्हनी उत्तर देण्याची इको सिस्टिम भाजपकडून सुरू आहे. पण, त्यासाठी तुमच्याकडून अपेक्षा आहेत.

Devendra Fadnavis
Pandharpur PWP Convention : पंढरपुरातील अधिवेशनातून शेकाप फुंकणार विधानसभेसाठी रणशिंग...

भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने आहेत. या सर्व कार्यकर्त्यांनी रोज एक जरी पोस्ट केली तरी फेक नरेटिव्ह संपून जाईल. पण, दुर्दैवाने आज मोकळेपणाने बोलतो, मला माफ करा. पण, आमचे लोकप्रतिनिधीही पोस्ट करत नाहीत. आपल्या लोकप्रतिनिधींची हॅंडल बघा. अरे बाबानो, आपण लढाई जमिनीवर लढतो आहोत. पण, ही लढाई टेक्नोलॉजी आणि व्हर्च्युअलही झाली आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

तुमच्या विरोधातील खोटा नॅरेटिव्ह टेक्नोलॉजीने जनतेपर्यंत पोहोचवला आहे. त्याला तुम्ही उत्तर दिलं नाही, तर तुम्हाला जमिनीवर मेहनत करावीच लागेल. ती आपण करतो आहोतच. पण, या फेक नेरटिव्हला आपण उत्तर दिलं नाही तर आपण, त्याचा मुकाबला करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी गांभीर्याने घेतले तरच मोठे परिवर्तन होऊ शकणार आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis
Pune BJP Convention : 'देवाभाऊ म्हणजेच महाराष्ट्राचा विकास'; पुण्याच्या अधिवेशनात दिसली भाजपच्या विधानसभा प्रचाराची झलक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com