मिटकरींचे मंत्रोच्चारण वादात; पुण्यात ब्राह्मण महासंघ आणि राष्ट्रवादीमध्ये तुफान राडा

NCP | Amol Mitkari : मिटकरींनी केलेल्या विधानांमुळे ब्राह्मण, हिंदू समाजाची बदनामी झाल्याचा आरोप
Amol Mitkari News, Amol Mitkari on Gunratna Sadavarte
Amol Mitkari News, Amol Mitkari on Gunratna Sadavarte Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची मंत्रोच्चारणा आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या मंत्रोच्चारणाचा निषेध करत ब्राम्हण महासंघाने राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आंदोलन केले. यावेळी या आंदोलकांचा मिटकरी यांच्याविरोधात कमालीचा रोष दिसून आला. लग्नाचा विधी, कन्यादान याविषयी अमोल मिटकरींनी केलेल्या विधानांमुळे ब्राह्मण, हिंदू समाजाची बदनामी झाल्याचा आरोप ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आला.

सोबतच अमोल मिटकरी मानसिक रुग्ण असल्याचे म्हणतं संतप्त झालेल्या आंदोलकांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातही घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच अमोल मिटकरींवर कारवाई करावी, अशी मागणीही आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही ब्राम्हण महासंघाच्या आंदोलकांना विरोध करत मिटकरींची भाषा आणि भाषाशैली योग्यच असल्याचा दावा केला आहे.

Amol Mitkari News, Amol Mitkari on Gunratna Sadavarte
आशिष शेलारांनी शिवसेनेला आव्हान देताच किशोरी पेडणेकरांनी दिलं उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणाले, जर त्यांनी अश्लील घोषणा दिलेल्या असतील तर त्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत, मात्र नेत्यांबद्दल वाईट घोषणा देणार असाल, तर कुणीही हे सहन करणार नाही, असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. तसेच अमोल मिटकरींच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, हे भाषण म्हणजे हा त्यावेळचा एक विनोद होता. मात्र महाराष्ट्रात आज काल विनोद बुद्धी राहिलेली नाही. राजकीय रंग देऊन, इश्यू करून त्याचे फायदे घ्यायचे धंदे सुरू आहेतअसे प्रत्त्युत्तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिले.

Amol Mitkari News, Amol Mitkari on Gunratna Sadavarte
गुजरातमध्ये राजकारण तापलं; काँग्रेस आमदार जिग्नेश मेवानींना मध्यरात्री अटक

अमोल मिटकरी यांनी या प्रकरणानंतर आपण माफी मागणार नसल्याचे म्हंटले आहे. माफी कशासाठी मागायची असा सवाल मिटकरी यांनी केला. दरम्यान इस्लामपुरच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची आपल्या भाषणात खिल्ली उडवली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अमोल मिटकरींनी विविध मंत्रोच्चार जसे की हनुमान स्तोत्र, कन्यादान विधी आदींचे उच्चारून खिल्ली उडवली, त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे कुत्सितपणे हसत होते असाही आरोप करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com