Pimpri Vidhansabha Constituency : शिवसेनेच्या पिंपरीत विधानसभेसाठी भाजपची जोरदार तयारी ! काय म्हणतात पदाधिकारी ?

BJP and Shivsena In Pimpri : २०२४ ला पिंपरीत शिवसेनेचा आयात उमेदवार असणार?
Pimpri Chinchwad BJP
Pimpri Chinchwad BJPSarkarnama
Published on
Updated on

BJP May Claim Pimpri Constituency : जागावाटपात शिवसेनेकडे असलेल्या मावळ आणि शिरूर लोकसभा या मतदारसंघात भाजपने जोरदार तयारी सुरु करून तेथील शिवसेना (शिंदे) इच्छुकांचे 'टेन्शन' तूर्तास वाढवले आहे. तशीच जय्यत तयारी भाजपने विधानसभेलाही सुरु केली आहे. यामुळे शिवसेनेच्या पिंपरी विधानसभेतील शिवसेना इच्छुकांचेही 'ब्लड प्रेशर' वाढले आहे. (Latest Marathi News)

पिंपरी-चिंचवडमधील तीनपैकी भोसरी आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार अनुक्रमे महेश लांडगे आणि अश्विनी जगताप आहेत. तर, पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे आमदार आहेत. मात्र, येत्या विधानसभेला २०२४ ला पिंपरीत युतीचा आमदार करून शहरात शत-प्रतिशत भाजप करण्याचा निश्चय पक्षाच्या पिंपरीतील पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. २१) केला.

Pimpri Chinchwad BJP
Surekha Punekar Join BRS : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी ; BRS मध्ये प्रवेश

पिंपरीत मोदी @ ९ मोहिमेतील 'घर चलो अभियानाच्या पत्रकापरिषदेत भाजपने विधानसभेबद्दल आपला मनोदय व्यक्त केला. युतीच्या जागावाटपात पिंपरीची जागा शिवसेनेकडे आहे. २०१४ ला तेथून शिवसेनेचे अॅड. गौतम चाबूकस्वार विजयी झाले होते. तर, गतवेळी २०१९ ला त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे या जागेवर शिवसेनेचा दावा आहे. मात्र, यावेळी शिंदे शिवसेनेकडे तुल्यबळ इच्छूक उमेदवार नाही. परिणामी ते तगडा उमेदवार आयात करण्याची चर्चा आहे.

शिंदे शिवसेनेचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पिंपरी-चिंचवड दौऱ्यात राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार बनसोडे यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे पिंपरीतील शिवसेनेच्या जागेबाबत चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. दुसरीकडे भाजपकडे पिंपरीत एकापेक्षा अधिक तुल्यबळ उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांचीही येथे जोरदार तयारी सुरु आहे.

Pimpri Chinchwad BJP
BMC Covid Scam News : '' कोविड घोटाळाप्रकरणी सुरज चव्हाणच टार्गेट का? जाधव,चहल...'' ; ठाकरे गटाच्या खासदाराची मोठी मागणी

पिंपरीची जागा भाजप लढविणार आहे का, यावर बोलताना भाजपने सावध भूमिका घेतली. याबाबत 'सरकारनामा'शी बोलताना भाजपच्या निरीक्षक वर्षा डहाळे म्हणाल्या, "पिंपरीतील युतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी कटिबद्ध राहू." तर पिंपरी भाजपचे निवडणूक प्रमुख अमित गोरखे म्हणाले, "पक्ष ठरवेल तो उमेदवार निवडून आणू. दरम्यान पिंपरीतील ६० हजार घरात जाऊन गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती देणार आहोत."

Pimpri Chinchwad BJP
Congress News : या 'तेरा' मतदारसंघात काँग्रेसला विजयाची खात्री; राज्यात डबल आकड्यात जाण्यासाठी कोअर कमिटीच्या बैठकीत ठरली विशेष रणनीती!

यावेळी आमदार उमा खापरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, शहर प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष अनुप मोरे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, महिला मोर्चा अध्यक्ष उज्वला गावडे, माजी नगरसेवक अनुराधा गोरखे, माउली थोरात, शितल शिंदे, शैलेश मोरे आदी उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com