

Pune News : पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच विधानसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झाले त्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होणारा आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १ जानेवारी पासून ही कारवाई सुरू होणार असून निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मतदारयादी अद्ययावत, अचूक आणि पारदर्शक राहावी यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
त्यानुसार एकत्रित प्रारूप मतदारयादी सोमवार, 9 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 9 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मतदारांकडून हरकती सूचना मागवण्यात येणार आहेत.
प्राप्त दावे व हरकतींची छाननी करून त्या 6 मार्च 2026 पर्यंत हे दावे निकाली काढण्यात येणार असून, 10 मार्च २०२६ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
या प्रक्रियेची यशस्वी अंमलबजावणी व्हावी आणि मतदान केंद्रांची यादी तयार करताना स्थानिक पातळीवर योग्य सुसूत्रता राहावी, यासाठी पुणे जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच बारामतीचे मतदार नोंदणी अधिकारी यांच्या पातळीवर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांशी बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. या बैठकींमध्ये राजकीय पक्षांना संपूर्ण कार्यक्रमाची सखोल माहिती दिली जाईल आणि त्यांच्या सूचना, अभिप्राय तसेच आवश्यक चर्चा घेऊन सूचना-आदानप्रदान केले जाईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
नियमानुसार रिक्त झालेली विधानसभेची जागा ही सहा महिन्याच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून भरणे आवश्यक असते त्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने ही पावलं उचलली आहेत. मात्र ही निवडणूक बारामती सह राज्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीचा पुढचा आमदार कोण असणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच बारामतीमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या निधनामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.