

Pune Crime News : बुधवार पेठेत ‘स्टिंग ऑपरेशन’च्या नावाखाली महिलेचे चित्रीकरण केल्याप्रकरणी पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार एका लॉजमध्ये घडला आहे.
महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार रोहन कदम याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना तीन दिवसांपूर्वी मध्यरात्री घडली आहे. या घटनेची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहोचल्यावर चौकशी करण्यात आली. तपासात ‘स्टिंग’च्या नावाखाली चित्रीकरण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान, या घटनेचा पुणे श्रमिक पत्रकार संघाने निषेध नोंदवत संबंधितावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
पत्रकार संघाकडून पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तीन दिवसांपूर्वी बुधवार पेठेमध्ये एका लॉज मध्ये एका पत्रकाराने महिलेसोबत विनयभंग केला हे प्रकरण अतिशय घृणास्पद आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अनेक पत्रकारांची बदनामी झालेली आहे. हा प्रकाराने पुणे श्रमिक पत्रकार संघासाठी मनस्ताप झाला आहे. त्यामुळे या प्रकारचा आम्ही जाहीर निषेध करतो.
हे प्रकरण बाहेर आल्यानंतर या संदर्भात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून एक यंत्रणा कार्यरत होती अशी चर्चाही आहे. गुन्हा दाखल होऊ नये म्हणून प्रयत्न करणारे पत्रकार व अन्य मंडळी यांच्याशी पुणे श्रमिक पत्रकार सहमत नाही. गुरुवारी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास पत्रकार संघ कोणताही अडथळा आणणार नाही असे भेटून सांगितले आहे. त्यानंतर आता आम्ही आपणास पत्र देऊन हीच भूमिका स्पष्टपणे मांडत आहोत, असे पत्रकार संघाने आयुक्तांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे.
पत्रकार संघाच्या पत्रात पुढे म्हटले आहे की, या प्रकरणात पुणे श्रमिक पत्रकार संघ चुकीचे काम करणाऱ्या कोणत्याही पत्रकाराच्या पाठीशी उभा राहणार नाही. उलट त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी ही आमची मागणी आहे. पुण्यातील पत्रकारांची सुरक्षा, त्यांचा मानसन्मान यासाठी कायमच पत्रकार संघाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. वेळोवेळी त्या संदर्भात पत्र व्यवहार देखील केलेला आहे. पोलिसांनी त्यास प्रतिसाद ही चांगला दिलेला आहे. मात्र अशा प्रवृत्तीच्या विरोधात पत्रकार संघ उभा असून यातील आरोपी व त्यास मदत करणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांना पत्रकार संघ कोणताही पाठिंबा देत नाही,
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.