
Pune, 10 January : पवारसाहेबांचं दुर्दैव असं आहे की, त्यांनी कोणाची स्तुती केली तरी तुम्हाला शंका येते आणि त्यांनी कोणावर टीका केली तरी शंका येते. ते मात्र खमके आहेत. तुम्ही त्यांना काहीही म्हणा. ते याही वयात कामच करत असतात, त्यामुळे त्यांनी स्तुती केली तर चांगलेच आहे ना. पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची का स्तुती केली, असू म्हणून तुम्ही त्याकडे संशयाने का बघता, असा उलटा सवाल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विधानसभा निवडणुकीत केलेल्या कामाचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी कौतुक केले आहे. त्याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आले होते, त्याला उत्तर देताना चंद्रकांतदादांनी पवारांबाबत हे विधान केले आहे. पालकमंत्रिपदाबाबत चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे.
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, पालकमंत्रिपदासाठी माझं नाव चंद्रपूर, अमरावती, बीड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांसाठी चर्चिले जात आहे. मी मात्र ठरवलं आहे की, देवेंद्र फडणवीस हे सांगतील तो जिल्हा घ्यायचा आणि कामाला लागायचे. महाविकास आघाडीचे कोणते खासदार आमच्या संपर्कात आहेत, याची मला माहिती नाही. माझ्याकडे ते काम असते तर मी तुम्हाला नक्की माहिती दिली असती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संपूर्ण जगाला विचार दिला आहे. जो विचार हिंदू नावामुळे आक्षेपार्ह असेल पण तो कार्यपद्धतीशी जोडला गेला आहे. प्रामाणिकपणा, विश्वासर्हता, पारदर्शकता हे सगळे गुण म्हणजे हिंदू आहे. इंग्लंडमध्ये राहणारासुद्धा त्या अर्थाने हिंदूच आहे. पूजा पद्धतीवरून संघाने कधी हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन असं मानलं नाही, असा दावाही मंत्री पाटील यांनी केला.
ते म्हणाले, जी पूजापद्धती प्रत्येकाला भावते. ती त्याने करायची असते. ती करताना इतरांच्या पूजा पद्धतीचा आदर करायचा असतो. बारा हजार वर्षांच्या इतिहासात हिंदूंनी कधीही इतरांच्या पूजापद्धतीवर आक्रमण केलेले नाही. संघाने जी कार्यपद्धती स्वीकारली. शिस्त, प्रामाणिकपणा, इतरांना मोठं करण्यात आनंद वाटणं, हे शरद पवारच काय कोणालाही आवडणारं आहे.
आमच्या आदर्श कार्यपद्धतीत धनंजय मुंडे बसतात म्हणूनच ते आमच्यासोबत आहेत. अशा पद्धतीच्या कार्यपद्धतीमध्ये आदर्श आणि वस्तुस्थिती यामध्ये अंतर राहणारच आहे. त्याला विकास म्हणतात. आदर्श आणि वस्तुस्थिती यातील अंतर कमी करणे म्हणजेच विकास असतो. धनंजय मुंडेंमध्ये सर्व गोष्टी नसतील. पण आगामी काळात त्या येतील, असा आशावादही चंद्रकांतदादांनी बोलून दाखवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.