Pune Educational Fraud Case: बनावट प्रमाणपत्र प्रकरण: आठ जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल

Pune Crime: दोन हजार ७३९ विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्र वाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Pune Educational Fraud Case
Pune Educational Fraud CaseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : गेल्या काही दिवसांपूर्वी बनावट प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण उघडकीस आले. आता या प्रकरणी तब्बल आठ जणांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपींनी ३५ ते ८० हजार रुपये घेऊन असे बनावट प्रमाणपत्र दिल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे.

बनावट गुणपत्रिका आणि अन्य कागदपत्रे देण्यासाठी बोगस ११ बोर्ड व विद्यापीठे स्थापून त्याद्वारे तब्बल दोन हजार ७३९ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वाटल्याप्रकरणी मुख्य आरोपीसह आठ जणांविरोधात ३७० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Pune Educational Fraud Case
Pune Police: पोलीस आयुक्त रितेश कुमार ॲक्शन मोडवर; दोन दिवसांत दोन पोलीस निरीक्षकांसह दहाजण निलंबित

सय्यद इम्रान सय्यद इब्राहिम (वय ३८, रा.संभाजीनगर), संदीप कांबळे (रा.दुधारी,सांगली), जमाल शेख (वय ३६, रा.पांजरपोळ), अफताब शेख (वय २९,उस्मानाबाद), कृष्णा गिरी (वय ३९,बिडकीन), महेश ऊर्फ मुनीब विश्वकर्मा (वय ३५,रा.चांदीवली), संदीपकुमार शमलाशंकर गुप्ता (वय ३३, कुर्ला) आणि जगदीश रमेश पाठक (वय ३३,रा.रायगड) अशी आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Pune Educational Fraud Case
Pune Police News : पुण्यात विश्रामबाग ठाण्याच्या हद्दीत सुरक्षा 'राम भरोसे'; पोलीस निरीक्षकाची जागा रिक्तच

नेमकं प्रकरण काय?

सय्यद इम्रान या मुख्य आरोपीने २०१९ ला ‘महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल (एमएसओएस) नावाने वेबसाइट सुरु केली. या ओपन स्कूलला फी आकारण्याचा किंवा परीक्षा घेण्याचा अधिकार नसताना, आरोपीने स्वयंसेवी संस्थाची मान्यता घेत परस्पर विद्यार्थ्यांना फी आकरण्यासोबत प्रमाणपत्र देण्याचे विद्यार्थ्यांना मान्य केले.

त्या आधारे त्याने अनेक विद्यार्थ्यांकडून ३५ हजार ते ८० हजारांपर्यंत रकमा स्वीकारल्या. तब्बल दोन हजार ७३९ विद्यार्थ्यांना दहावी, बारावी, बीएससी, बीकॉम, बीए, डिप्लोमा आयटीआय, इंजिनिअरिंग, नर्सींगची प्रमाणपत्रे पैसे घेऊन वाटले असल्याचा ठपका आरोपींवर दोषारोपपत्रात ठेवण्यात आला आहे.

सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर, पोलीस नाईक गजानन सोलवनकर, पोलीस शिपाई राहुल होळकर यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास करून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत.

Pune Educational Fraud Case
Pimpri-Chinchwad: दोन दिवसांत दोन राजकीय खुनांचे कट उघड; निवडणुकीच्या तोंडावर अघटीत घडण्याची शक्यता

कोणत्या विद्यापीठांच्या नावाने दिली प्रमाणपत्र?

बनावट प्रमाणपत्र देण्यासाठी आरोपींनी काही बोर्ड स्थापन केली होती. एजवाज विद्यापीठ, अ‍ॅमडस विद्यापीठ, अ‍ॅमडस युनिव्हर्सिटी, एमबीटीईई बोर्ड, एमएसओएस (महाराष्ट्र स्टेट ऑफ ओपन स्कूल), महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल, एमआरएमव्ही (महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठ), एएसओएस युनिव्हर्सिटी, बीएसईएम (बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन मराठवाडा) आणि बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन मराठवाडा, अशी ऑनलाइन विद्यापीठे आणि बोर्ड स्थापन केली.

या प्रकरणावर सहायक पोलीस आयुक्त काय म्हणाले?

"ज्या विद्यार्थ्यांनी आरोपींकडून असे कुठले प्रमाणपत्रे घेतली आहेत त्यांनी ती पुणे पोलिसांकडे तातडीने जमा करावी. बनावट प्रमाणपत्राच्या आधारे जे नोकरीस लागले आहेत, त्याची माहिती विविध संस्था आणि कंपन्यांनी कळवावी. असे प्रमाणपत्र आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल", असा इशाराही यावेळी सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगांवकर यांनी दिला.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.