Devendra Fadnavis News: '...अन् त्यांच्या नाराजीच्या बातम्या पसरविल्या गेल्या!'; 'सीएम' फडणवीसांचा एकनाथ शिंदेंविषयी सर्वात मोठा खुलासा

Chief Minister Devendra Fadnavis Political Statement : राहुल गांधी हे सतत भ्रमात राहणारे नेते आहेत. जनतेने त्यांची साथ सोडली आहे याची जाणीवही त्यांना होत नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासारख्यांना बरोबर घेऊन त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या, तर त्यांचे विचारही तसेच राहणार.
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदापासून दूर राहावं लागलं त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खुलासा केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी (ता.8) जयपूर डायलॉग'च्या डेक्कन समिट कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नाराजीबाबत विचारला असता फडणवीस म्हणाले, शिंदे यांच्या नाराजीच्या सतत येणाऱ्या बातम्या केवळ करमणूक करणाऱ्या आहेत. नाराज आहे यामध्ये कोणतेही तथ्य नाहीत.

एकनाथ शिंदे हे धीरगंभीर व्यक्तिमत्त्वाचे नेते आहेत. त्यांची तशीच छायाचित्र प्रसिद्ध करून त्यांच्या नाराजीच्या बातम्या पसरविल्या गेल्या, असे सांगतानाच फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांमध्ये सर्जनशीलता राहिलेली नाही अशी टीका केली. माहितीच्या मुळाशी जाण्याची, खात्री करून घेण्याची, शोध घेण्याची, नवनवीन विषयांना भेटण्याची वृत्ती आणि गांभीर्य माध्यमांमध्ये राहिले नाही, अशी टीकाही फडणवीस केली.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Jayant Patil : जयंत पाटलांच्या भाजपप्रवेशाबाबत कार्यकारी प्रदेशाध्यक्षांचे मोठे विधान; ‘ऑपरेशन लोट्‌स’चे संकेत

पुढे फडणवीस म्हणाले, राहुल गांधी हे सतत भ्रमात राहणारे नेते आहेत. जनतेने त्यांची साथ सोडली आहे याची जाणीवही त्यांना होत नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासारख्यांना बरोबर घेऊन त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या, तर त्यांचे विचारही तसेच राहणार. मात्र, या भ्रामक विचारांमुळे राजकतावाद्यांना बळ मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

देशातील संवैधानिक यंत्रणाबाबत अपप्रचार करून त्यांच्याबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा 180 अराजकतावादी संघटनांचा कट आहे. राहुल गांधी यांच्या भ्रामक विधानांमुळे त्यांना बळ मिळते आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
PM Narendra Modi News : ऐतिहासिक विजयानंतर मोदी-शहांचा आनंद गगनात मावेना! दिल्लीकरांना दिलं मोठं आश्वासन...

काँग्रेस नेते नेते राहुल गांधी यांच्या भ्रामक विचारांमुळे देशात अराजक निर्माण करण्याचा कट करणाऱ्या शक्तींना बळ मिळत आहे. राहुल गांधी यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकीपेक्षा राज्यातील विधानसभा निवडणुकीत 40 लाख मतदार वाढल्याचा दाखला देऊन हे भाजपचे 'व्होट इंजीनियरिंग' असल्याचा आरोप केला होता. या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या पराभवाच्या कारणांचा शोध घेतला तरच त्यांचा पक्ष टिकून राहील. मात्र, ते केवळ कारण शोधत राहिले तर आगामी काळात काँग्रेसची अवस्था आणखी बिकट झाल्याशिवाय राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांमध्ये तब्बल एक कोटी मतांचा फरक याकडे देखील राहुल गांधी यांनी पहावं असा खोचक टोला देखील फडणवीस यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com