
New Delhi News : दिल्लीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी दिल्लीकरांचे आभार मानतानाच मोठे आश्वासनही दिले आहे. जनशक्ती सर्वोपरी म्हणत त्यांनी हा विजय म्हणजे विकास आणि सुशासनाचा असल्याचे म्हटले आहे. हा विजय ऐतिहासिक असल्याचेही मोदींनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियात दिल्लीतील विजयाबद्दल पोस्ट लिहिली आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात ते आज रात्री जल्लोषात सहभागी होऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. पण त्याआधी त्यांनी सोशल मीडियातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दिल्लीचा चौफेर विकास आणि येथील लोकांचे जीवन उत्तम बनविण्यासाठी आम्ही कसलीही कसर ठेवणार नसल्याचे आश्वासन मोदींनी दिले आहे.
विकसित भारताच्या निर्माणासाठी दिल्लीची महत्वाची भूमिका राहील, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही मोदींनी पोस्ट म्हटले आहे. दिल्लीतील सर्व बहिणी आणि भावांना भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्लाबद्दल माझे वंदन आणि अभिनंदन. तुम्ही जो भरभरून आशीर्वाद आणि स्नेह दिला, त्यासाठ हृद्यापासून आभार, असे मोदी म्हणाले आहेत.
मला भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचाही गर्व वाटतो. त्यांनी प्रचंड जनादेशासाठी रात्रं-दिवस एक केले. आता आम्ही आणखी मजबूतपणे दिल्लीवासियांच्या सेवेत समर्पित राहू, असे आश्वासन मोदींनी दिल्लीकरांना दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सोशल मीडियात पोस्ट करत दिल्लीकरांचे आभार मानले आहेत.
जनतेला सतत खोटी आश्वासने देऊन दिशाभूल केली जाऊ शकत नाही, हे दिल्लीकरांनी दाखवून दिले आहे. जनतेने आपल्या मतांनी अस्वच्छ यमुना, पिण्याचे अस्वच्छ पाणी, खड्डेमय रस्ते, ओव्हरफ्लो झालेली गटारे आणि प्रत्येक गल्लीत दारू दुकानांचे उत्तर दिले आहे. ता मोदींच्या नेतृत्वाखाली दिल्ली एक आदर्श राजधानी बनेल, असा विश्वास शहांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.