Pune Congress News : आगामी लोकसभा निवडणुकीचे आता सर्वांनाच वेध लागले आहेत, तर राजकीय पक्षांनी देखील कंबर कसली आहे. दरम्यान पुणे लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने काँग्रेसकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. नुकतंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुणे दौरा झाल्यानंतर आता काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवणे सुरू केले आहे.
खरंतर एकीकडे महाविकास आघाडीच्या राज्य व केंद्रात बैठका सुरू आहेत. तर दुसरीकडे पुणे लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांकडून शहर कॉंग्रेस पक्षाने रविवारपासून अर्ज मागविण्यास सुरूवात केली आहे. इच्छुक उमेदवारांना मंगळवार (ता.9) पर्यंत कॉंग्रेस भवन येथे अर्ज सादर करावे लागणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कॉंग्रेस(Congress) पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी याबाबतचे पत्रक रविवारी काढले. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या आदेशानुसार, पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीने पुणे लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे स्पष्ट केले.
लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण माहितीसह आपले अर्ज मंगळवारपर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत सादर करावे लागणार असल्याचे शिंदे यांनी पत्रकामध्ये नमूद केले आहे. अर्ज प्रक्रिया सुरू करून कॉंग्रेसने निवडणुकीसाठीची तयारी सुरू केल्याची चिन्हे आहेत.
महायुतीमध्ये पुण्याची जागा भाजपकडे आहे, तर महाविकास आघाडीमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेस पक्षाकडे आहे. दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस(NCP) पक्षाकडून पुण्याच्या जागेवर दावा केला जात होता. परंतु, शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्येही दोन गट पडले. त्यामुळे पुण्याची जागा कॉंग्रेसकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
परिणामी, कॉंग्रेस पक्षाने इच्छुकांकडून अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेला तत्काळ सुरवात करत एक पाऊल पुढे टाकले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीकडून पदाधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवली गेली आहे. ज्यामध्ये माजी आमदार मोहन जोशी यांना अहमदनगर, आमदार रवींद्र धंगेकर यांना सातारा, संजय बालगुडे यांना माढा आणि अभय छाजेड यांच्याकडगे हातकंनगलेची जबाबदारी सोपवली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.