Pune ZP : महापालिकेच्या रणधुमाळीतच अजितदादांची पुणे जिल्हा परिषदेसाठी फिल्डिंग; 3 शिलेदारांवर मोठी जबाबदारी

Ajit Pawar Maharashtra ZP election fielding plan : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दादांनी आखला मास्टरप्लॅन. तीन शिलेदारांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वाचा कोण आहेत ते तीन शिलेदार.
ajit pawar zp election
ajit pawar zp electionSarkarnama
Published on
Updated on

Pune News : सध्या राज्यभरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. आणि या बालेकिल्ल्यांमध्ये आपलं वर्चस्व राखण्यासाठी अजित परवानांनी पूर्ण ताकद लावली आहे. यासाठी गेले काही दिवस अजित पवार पुण्यामध्ये ठाण मांडून आहेत.

त्यामुळे एकीकडे पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषद निवडणुकीची देखील फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. कारण महापालिका निवडणुका नंतर अवघ्या काही दिवसातच जिल्हा परिषदा निवडणुका देखील होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये पक्षाची घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून काही नेमणुका करण्यात आल्या आहेत.

ajit pawar zp election
Municipal Election Voting Process : महापालिकेसाठी EVM वर कितीवेळा बटन दाबवे लागणार? मतदान करण्यापूर्वी महत्त्वाचा नियम समजून घ्या!

इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या तत्कालीन राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष प्रदीप गराटकर यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त असलेल्या पुणे जिल्हाध्यक्ष पदावर आता अजित पवार यांनी तीन नेत्यांच्या नियुक्ती केल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या नियुक्त्या करण्यात आल्या असून एक नव्हे तर तीन जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेमण्यात आले आहेत.

बारामती, इंदापूर, पुरंदर आणि दौंड यासाठी संभाजी होळकर यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर भोर, मुळशी आणि मावळ यासाठी विठ्ठल शिंदे आणि शिरूर,जुन्नर खेड, आंबेगाव या भागाची जिल्हाध्यक्ष म्हणून राजेंद्र कोरेकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ajit pawar zp election
Pune development : केंद्र आणि राज्याच्या भरवशावर पुण्याचा विकास

मागील अनेक वर्ष पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. आगामी काळात ही सत्ता अबाधित राखण्यासाठी अजित पवारांनी मास्टर प्लॅन बनवला आहे. त्याचाच भाग म्हणून ही नियुक्त करण्यात अली असल्याचे सांगितले जात आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये देखील अजित पवार स्वबळावरती निवडणुका लढतील हे जवळपास निश्चित मानल्या जात आहे त्या दृष्टिकोनातून आतापासूनच दादांनी फिल्डिंग लावण्यात सुरुवात केली असल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com