Harshvardhan Patil Threat : हर्षवर्धन पाटलांचा राजकीय स्फोट; ‘मलाही इंदापूर तालुक्यात फिरू न देण्याच्या धमक्या येताहेत’

Indapur Politics : आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरची जनता ही स्वाभिमानी आहे. भष्ट्राचारी व्यक्तीच्या पाठीमागे जाणार नाही, निष्क्रीय व्यक्तीच्या बरोबर जाणार नाही, हे दाखवून देईल, असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
Harshvardhan Patil
Harshvardhan Patil Sarkarnama
Published on
Updated on

Indapur news : इंदापूर तालुक्याची संस्कृती बदलली आहे. मलाही (हर्षवर्धन पाटील) तालुक्यात फिरू देणार नसल्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. जनतेलाही दमदाटी करण्यात येत आहे. आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरची जनता ही स्वाभिमानी आहे. भष्ट्राचारी व्यक्तीच्या पाठीमागे जाणार नाही, निष्क्रीय व्यक्तीच्या बरोबर जाणार नाही, हे दाखवून देईल, असे सांगून भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकले

इंदापूर (Indapur) तालुक्यातील जंक्शन येथे भाजपच्या विजय संकल्प-२०२४ च्या कार्यक्रमात पाटील बोलत होते. त्यावेळी त्यांनी माजी मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यावर नाव न घेता तुफान हल्लाबोल केला. याच विजय संकल्प मेळाव्यात हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी आगामी विधानसभेची निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Harshvardhan Patil
Baramati Namo Maharojgar Melava : बारामतीतील नमो महारोजगार मेळाव्यास शरद पवारांचीही उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली भारतीची प्रगती सुरू आहे. मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वांनी प्रयत्न करावेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवाव्यात. केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा निधी आणलेला आहे, याची माहिती जनतेला देण्यात यावी, अशी अपेक्षा हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, इंदापूरची स्वाभिमानी जनता भष्ट्राचार करणारा आणि निष्क्रीय व्यक्तीच्या बरोबर जाणार नाही, हे आगामी विधानसभा निवडणुकीत दाखवून द्यावे. जातीयवाद, कमिशनखोर व गुंडगिरी करणाऱ्यांच्या पाठीमागे तालुका उभा राहणार नसल्याचा संदेश आपल्याला द्यायचा असून, त्यासाठी सर्वांनी आजपासून तयारीला लागावे. गावाेगावी बूथनुसार काम करावे.

Harshvardhan Patil
Shivtare warning to Ajitdada : शिवतारेंच्या तोंडी इंदापूरच्या पाटलांची भाषा; ‘विधानसभेचा क्लीअरन्स मिळाल्याशिवाय...'

इंदापूर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. उजनी धरणाच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. अधिकाऱ्यांच्या पातळीवर टंचाईची बैठक घेणे गरजेचे आहे. टॅंकरचे प्रस्ताव पाठविणे गरजचे आहे. मात्र, ही कोणाची जबाबदारी आहे? असा सवाल करून हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांचे नाव न घेता टीका केली.

विरोधकांचा पापाचा घडा भरलाय

इंदापूर तालुक्यातील विराेधकांचा पापाचा घडा आता भरला आहे. त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये २००९ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार आहे. विरोधकांचा पापाचा घडा रिकामा होणार आहे, असे भाकीत भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी केले.

R

Harshvardhan Patil
Pandharpur News : आमदार पुत्राला मराठा समाजाने विचारला जाब; ‘तुम्ही ओबीसी प्रमाणपत्र काढलं; समाजासाठी काय केले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com