Dattatray Bharane News: राष्ट्रवादीतल्या गटबाजीवर दत्तात्रय भरणे म्हणाले, 'पक्षाची ताकद मोठी म्हणून...'

Dattatray Bharane : शिरूर व बारामती मध्ये कुणी आलं तरी येथे राष्ट्रवादीचाच उमेदवारच निवडून येईल.
Dattatray Bharane
Dattatray Bharane Sarkarnama
Published on
Updated on

Dattatray Bharane : राष्ट्रवादीच काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पुण्यात पक्षाची आढावा घेतली. पुणे जिल्ह्यातील विविध तालुकावर पक्षाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीमध्ये पवार यांनी पक्षाच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान या बैठकीत वेल्हे तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांनी पवारांसमोर पक्षातील गटबाजीबद्दल तक्रार केल्याचे समजते. यावर आता राष्ट्रवादीचे इंदापुरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Dattatray Bharane
Maharashtra Bhavan : योगी आदित्यनाथांकडून मुख्यमंत्री शिंदेंना मिळाले मोठं गिफ्ट

दत्तात्रय भरणे म्हणाले, "पुणे जिल्हयातील शिरूर व बारामती या तालुक्यातील पक्ष संघटनेबाबत ही बैठक सुरू आहे. प्रत्येक तालुक्यातील संघटनात्मक काम, त्यातील अडी-अडचणी सोडवण्यासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकींचा आढावा ही यावेळी घेतला गेला. यावेळी वरीष्ठ नेत्यांची काय व कशी मदत घेता येईल ,याची माहिती दिली गेली. "

राष्ट्रवादीतल्या अंतर्गत गटबाजीवर बोलताना भरणे म्हणाले, "राष्ट्रवादीची पुणे जिल्ह्यात मोठी ताकद जास्त आहे. यामुळे मतभेद आहेत हे मात्र खरं आहे. या मतभेदांवर चर्चा करण्यात आली. शिरूर व बारामती मध्ये कोणी आलं तर येथे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारच निवडून येईल. बाहेरच कोणी ही इथे आला तरी लोक राष्ट्रवादी काँग्रेसलाच ताकद देतील. राज्यपाल यांनी केलेल्या वक्तव्यावरून लक्ष हटवण्यासाठीच अजितदादा यांच्यावर वर टीका होत आहे."

Dattatray Bharane
Chhagan Bhujbal News: शरद पवारांना 'जाणता राजा' म्हणण्यात अडचण काय ? छगन भुजबळांचा सवाल

छत्रपती संभाजीमहाराज हे धर्मवीर की स्वराज्यरक्षक या वादावर बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, "कोणी काही म्हणो, छत्रपती संभाजीमहाराजांचा उल्लेख आम्ही स्वराज्यरक्षक असंच करणार, बाकीच्यांनी काय म्हणायचे आहे ते म्हणा. आमच्यासाठी स्वराज्यरक्षकच, असे भरणे यांनी ठणकावून सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com