Devendra Fadnavis : "महापालिका कमिशनचा धंदा नाही; कोणी कितीही मोठा असला तरी..." : पहिल्याच भेटीत CM फडणवीसांचा नगरसेवकांना कडक इशारा

Pune Municipal Corporation News : पुणे महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांना देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच भेटीत कडक इशारा दिला. पारदर्शक कारभार, शिस्त आणि जनतेच्या विश्वासाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
Fadnavis addressing newly elected BJP corporators in Pune, delivering a strong message on transparency, responsibility, and governance after the municipal election results.
Fadnavis addressing newly elected BJP corporators in Pune, delivering a strong message on transparency, responsibility, and governance after the municipal election results.Sarkarnama
Published on
Updated on

PMC News : पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला. यानंतर निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. तसेच यावेळी या सर्व नगरसेवकांना फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी या नगरसेवकांना काही सूचना केल्या आहेत.

मार्गदर्शन करताना फडणवीस म्हणाले, आनंदाचा क्षण आहे. भाजपने पुण्यामध्ये इतिहास रचला आहे.पुण्याच्या इतिहासात इतका प्रचंड बहुमत गेले 30-35 वर्षात मिळाल्यालं मी तरी कुठल्या पक्षाला पाहिलेलं नाही. पुणेकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्यावर मोहर उमटवलेली आहे. त्यामुळे पालिकेचा कारभार देखील पारदर्शकपणे करा.

पुण्यात फार चुरशीची लढत आहे असं मीडियामध्ये दाखवलं जात होतं. आपल्या कार्यकर्त्यांनी चुरशीच्या लढतीला एकतर्फी केलं त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. एवढं बहुमत मिळत तेव्हा आनंद होतोच, पण दुसरीकडे जबाबदारही वाढली आहे. प्रचंड मोठ्या अपेक्षेने पुणेकरांनी आपल्याला बहुमत दिला आहे. जर त्यांच्या अपेक्षाला आपण पात्र ठरलो तर पुढचे 25 वर्ष आपल्याला कोणी हलवू शकणार नाही. मात्र जर पुणेकरांच्या विश्वासाला पात्र ठरलो नाही तर हा विजय लाटेसारखा निघून जाईल.

कुठल्याच विजयानंतर मोदीजी (Narendra Modi) शांत बसत नाहीत. लगेच पुढच्या पाच वर्षाचे विकासाचं व्हिजन तयार करतात. आपल्यालाही पुण्याच्या विकासाचे नियोजन करायचा आहे. महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेते, समित्या सगळ्या नेमल्या जातील. मात्र माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की यामध्ये कुणाला यावर्षी संधी मिळेल, तर कोणाला पुढच्या वर्षी संधी मिळेल. मात्र पुणेकरांनी दिलेलं बहुमत महत्त्वाचं आहे.

Fadnavis addressing newly elected BJP corporators in Pune, delivering a strong message on transparency, responsibility, and governance after the municipal election results.
PMC Election Results 2026: होय, मी बाजीरावच! म्हणणाऱ्या अजितदादांना पुण्यात दोन दाढीवाल्या पहिलवानांनी लोळवलं

महापालिकेतील पद घेण्या-देण्यावरून जर चर्चा झाली तर पुणेकर आपल्याला माफ करणार नाही. पक्ष ज्यांना महापालिकेची जी जबाबदारी देईल त्यांनी तिथे पारदर्शक कारभार करायचा आहे. महानगरपालिका हा काही आपला कमिशनचा धंदा नाही, महापालिका आपला व्यवसाय नाही. सामाजिक आर्थिक परिवर्तन म्हणून आपण हातात घेतलेला आहे. तशाच प्रकारचा व्यवहार महानगरपालिकेमध्ये सर्वांकडून अपेक्षित आहे.

Fadnavis addressing newly elected BJP corporators in Pune, delivering a strong message on transparency, responsibility, and governance after the municipal election results.
PMC Election Result 2026 : अजितदादांना सर्वात मोठा धक्का; पहिलवानाचा परफेक्ट डाव; वाचा पुण्यातील विजयी उमेदवारांची नावे...

आनंदाच्या क्षणीच कडवट सांगितलेलं बरं असतं. महापालिकेत कुठल्याही पद्धतीने उन्माद सहन करणार नाही. पारदर्शकतेचा अभाव मी कुठल्याही पद्धतीने चालणार नाही. कोणी कितीही मोठा असला तरी महानगरपालिकेत जनतेने दिलेल्या बहुमतापेक्षा मोठे कोणी नाही. जर लोकांच्या अपेक्षा आपण पूर्ण करणार नसलो तर त्या जागेवर राहण्याचा आपल्याला अधिकार नाही.पुणेकरांना जे आश्वासन दिले आहे ते येत्या दोन वर्षातच आपल्याला काम सुरू झालेला दिसेल, राज्याचे सरकार आणि केंद्राचे सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे. देशातली एक नंबरची महापालिका झाली पाहिजे असं आपण सगळे काम करू असं फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com