NEET Paper Leak: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही विरोधकांची आक्रमकता कायम : ठाकरे बंधूंनंतर प्रकाश आंबेडकरांनीही सांगितला पुढचा प्लॅन

Dharmendra Pradhan Resignation, Prakash Ambedkar, NEET Paper Leak: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर प्रकाश आंबेडकरांनी तीव्र टीका करत विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा, लाठीचार्जचा आणि नुकसानभरपाईचा उल्लेख नसल्याचा आरोप केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Prakash Ambedkar addresses a press conference criticizing Dharmendra Pradhan's resignation over the NEET paper leak controversy and reiterates support for the ongoing student protest.
Prakash Ambedkar addresses a press conference criticizing Dharmendra Pradhan's resignation over the NEET paper leak controversy and reiterates support for the ongoing student protest.Sarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar: NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून देशातील राजकारण तापले असतानाच, दिल्लीतील जंतर-मंतरवर मागील २८ दिवसांपासून सुरू असलेल्या तरुणांच्या तीव्र आंदोलनामुळे अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या मोठ्या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत. ठाकरे बंधूंपाठोपाठ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील याबाबत पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, प्रधान यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात हा राजीनामा पंतप्रधानांनी मागितला आहे, असे कुठेही वक्तव्य नाहीये. हा राजीनामा असणारा धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून दिला आहे, असे त्यांच्या पत्रामधून भासत आहे. तसेच त्या पत्रामध्ये त्यांनी जे काही वाक्य वापरलेली आहेत. त्याच्यामध्ये या आंदोलनामध्ये अ‍ॅन्टी-सोशल एलिमेंट्स, अ‍ॅन्टी-देश एलिमेंट्स जे घुसतात आहेत त्यामुळे हा राजीनामा द्यावा लागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केला आहे केलं आहे.

Prakash Ambedkar addresses a press conference criticizing Dharmendra Pradhan's resignation over the NEET paper leak controversy and reiterates support for the ongoing student protest.
Abhijeet Dipake: 'लेकानं करून दाखवलं!' CJP च्या यशानंतर अभिजीत दीपके यांच्या आई-वडिलांना अश्रू अनावर

त्यांनी कुठेही माझ्या अकर्तृत्वामुळे २२ जणांनी आत्महत्या केली, याच्याबद्दल त्या पत्रामध्ये कुठेही खंत नाही. तसेच कुठेही पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचाराचा, लाठीचार्जचा उल्लेख नाहीये. किंवा त्यांच्या पत्रामध्ये लाठीचार्जची चौकशी होणार, जे पोलीस दोषी आहेत त्यांच्यावरत कारवाई होणार याबाबत कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.

त्यामुळे आता पंतप्रधान स्वतः ज्या २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करणार का? आणि त्या विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार का याचा खुलासा होणार आवश्यक आहे. विद्यार्थी संघटनांनी देखील कॉम्पेन्सेशनचा मुद्दा हा आल्याशिवाय आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल सरकार बोलणार नसेल, तर मग आपण आंदोलन मागे का घ्यावे? असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला.

Prakash Ambedkar addresses a press conference criticizing Dharmendra Pradhan's resignation over the NEET paper leak controversy and reiterates support for the ongoing student protest.
'केंद्रात नरेंद्र अन् शिक्षण खात्यात धर्मेंद्र...'; CJP च्या आंदोलनावर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया

या राजीनाम्यापूर्वी सरकारमध्येच कुठेतरी विचारविनिमय झालेला दिसत नाही, तर धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहूनच राजीनामा देऊन आगीमध्ये तेल ओतण्याचे कामकाज केलं असल्याचं आंबेडकर म्हणाले. मात्र या आंदोलनात विद्यार्थी विजयी झालेत जे झुकणार नाही असे जे म्हणत होते, त्यांना पार नाक रगडायला विद्यार्थ्यांनी लावली असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. तसंच आंबेडकर म्हणाले की हे आंदोलन संपलेलं नसून पुढची भूमिका विद्यार्थ्यांनी जाहीर केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा त्यांना संपूर्ण पाठिंबा राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com