Pune Bazar Samiti: पुणे बाजार समितीत मोठी घडामोड! दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा तडकाफडकी राजीनामा

Dilip Kalbhor Resignation News: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काशिनाथ काळभोर यांनी आपल्या सभापतीपदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय आणि सहकारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. काळभोर यांनी आपल्या सभापतीपदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधकांकडे पाठवण्यात आला आहे.
Dilip Kalbhor resign .jpg
Dilip Kalbhor resign .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता.7 जुलै) मोठी घडामोड घडली. बाजार समितीचे सभापती दिलीप काशिनाथ काळभोर यांनी आपल्या सभापतीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय आणि सहकारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. काळभोर यांनी आपल्या सभापतीपदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधकांकडे पाठवण्यात आला आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Pune Bazar Samiti) सभापतीपदी दिलीप काळभोर यांची 9 मे 2023 रोजी बिनविरोध निवड झाली होती. मात्र,आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पुणे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांच्याकडे दिला आहे.

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद (Pradeep Kand), माजी सभापती प्रकाश जगताप, ज्येष्ठ संचालक रोहिदास उंद्रे, संचालक राजाराम कांचन, प्रशांत काळभोर, रामकृष्ण सातव, सुदर्शन चौधरी यांच्यासह बाजार समितीचे सर्व संचालक उपस्थित होते.

दिलीप काळभोर यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, माझ्या कार्यकाळात बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसोबतच बाजार विकासासाठी विविध योजना राबवल्या. तसेच समितीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यरत राहून अनेक निर्णय राबवल्याची माहितीही त्यांनी दिली.

Dilip Kalbhor resign .jpg
Bhaskar Jadhav : 'कोणी एकानं चालवणारं हे खातं...'; शिवसेना,भाजपनंतर भास्कर जाधवही निधीवाटपावरुन अजितदादांवर भडकले

तसेच आपल्या सभापतीपदाच्या कार्यकाळात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारात पारदर्शकता व शिस्त निर्माण करण्यात मोठे योगदान दिले. या पुढेही बाजार समितीच्या विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग ठेवणार असल्याचंही यावेळी काळभोर यांनी सांगितलं.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांचे स्वाक्षरीचे अधिकार काढण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. यावेळी बाजार समितीतील 18 संचालकांपैकी 10 संचालकांनी ठरावाच्या बाजूनं मतदान केलं होतं. तसेच सभापतीसह सात संचालकांनी सभात्याग तर एक संचालक गैरहजर राहिला होता.

Dilip Kalbhor resign .jpg
Mahayuti Government: महायुती सरकार लाडक्या बहिणीनंतर पुढचा धक्का बळीराजाला देणार? 'त्या' शेतकऱ्यांना 'ब्लॅक लिस्ट'मध्ये टाकणार

या निर्णयाविरोधात सभापती दिलीप काळभोर यांनी पणन संचालकाकडे अपील केले होते. या ठरावाला तत्कालीन पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्थगिती दिली होती. परंतु, यामुळे सभापती आणि संचालकांमधील तणाव उघड झाला होता.

तसेच, ऑगस्ट 2024 मध्ये काळभोर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल झाला होता, जो आवश्यक संचालकांच्या अनुपस्थितीमुळे नामंजूर झाला होता. या घटनांनी काळभोर यांच्यावरील दबाव वाढवला असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com