Dilip Khedkar Case Update : मोठी बातमी! दिलीप खेडकर यांना मोठा दिलासा; अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

IAS Pooja Khedkar News : दिलीप खेडकर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात अधिकारी होते. त्यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून अहमदनगरमधून लढवली होती.
Dilip Khedkar and Pooja Khedkar.jpg
Dilip Khedkar and Pooja Khedkar.jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी संपत नसताना त्यांचे वडील दिलीप खेडकर यांच्यासाठी दिलासादायक बातमी आली आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमावल्यामुळे लाचलुचपत विभागाच्या निशाण्यावर असलेल्या दिलीप खेडकर यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

वादग्रस्त ट्रेनी आयएएस (IAS) अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना नुकतीच पोलिसांनी अटक केली. मनोरमा यांच्यानंतर दिलीप खेडकर यांच्यावर देखील अटकेची टांगती तलवार होती. मात्र, न्यायालयाने खेडकर यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करत तात्पुरता दिलासा दिला आहे.

दिलीप खेडकर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात अधिकारी होते. वडील क्लास वन अधिकारी असूनही पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी ओबीसी कोट्यातून प्रवेश घेतला.2024 ची लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून अहमदनगरमधून लढवली होती.

त्यावेळी अर्ज दाखल करताना संपत्तीबाबतच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी 40 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचं प्रतिज्ञापत्रात जाहीर केलं होतं. त्यामुळे दिलीप खेडकर यांची चौकशी होणार आहे.

Dilip Khedkar and Pooja Khedkar.jpg
IAS Pooja Khedkar : वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांना पोलिसांनी का बजाविली दुसरी नोटीस, हे आहे कारण..!

पूजाचे वडील दिलीप खेडकर यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेहिशोबी मालमत्तेची प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. दिलीप खेडकर हे ही आयएएस राहिले असून सेवेत असताना त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून दोनदा निलंबित करण्यात आले होते.

दिलीप खेडकर गेल्या वर्षी 31 मे 2023 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळच्या संचालकपदावरून निवृत्त झाले होते. यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रात एन्ट्री घेत लोकसभा निवडणुकही लढवली होती.

Dilip Khedkar and Pooja Khedkar.jpg
Goa Asmitay Dis : गोव्याचे महाराष्ट्रात विलिनीकरण रोखणारा दिवस 'या' नावानं होणार साजरा; CM सावंतांचा मोठा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com