३ दिवसात ३ मंत्री : पुणे जिल्हा बँकेसाठी वळसे-पाटलांचा अर्ज दाखल

२ जानेवारीला मतदान (PDCC Bank Election)
Dilip Walse Patil
Dilip Walse Patilsarkarnama
Published on
Updated on

पुणे : पुणे जिल्हा बँकेच्या निवडणूक रिंगणात आता तिसऱ्या मंत्र्यांची एन्ट्री झाली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता पर्यंत या बँकेच्या निवडणूकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajip Pawar), राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatreya Bharane) यांनीही अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता तिसऱ्या मंत्र्यांच्या एन्ट्रीने या निवडणूकीतील चुरस आणखी वाढणार हे नक्की.

पीडीसीसीच्या संचालक मंडळातील २१ जागांकरिता २ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर, ४ जानेवारीला मतमोजणी आहे. बॅंकेच्या २१ पैकी सर्वाधिक १३ जागा अ वर्ग मतदारसंघात आहेत. एक जागा ब (पणन, प्रक्रिया), क (पतसंस्था, नागरी, बॅंका), ड (उर्वरित), एससीएसटी, एनटी, ओबीसी आणि महिला यांच्यासाठी आहे.

Dilip Walse Patil
भाजप आमदाराचे हसे : उद्घाटनाच्या नारळाने रस्त्यात पडला खड्डा

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २९ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून मुदत ६ डिसेंबरपर्यंत आहे. अर्जांची छाननी ७ तारखेला होऊन २ जानेवारीला मतदान होणार आहे. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी २१ जागांसाठी आतापर्यंत ६६ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. सुमारे १३२ जणांनी ४३२ उमेदवारी अर्ज नेले असल्याची माहिती आहे.

Dilip Walse Patil
सतेज पाटलांचा विजयी रथ सुसाट : जिल्हा बँकेत बिनविरोध

दत्तात्रय भरणे (Dattatrya Bharne) यांनी बुधवारी (ता. १ डिसेंबर) ‘ब ’ वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मागील २५ वर्षांपासून ते बँकेचे संचालक आहेत. त्यानंतर अजित पवार यांनीही 'अ' वर्गातून बारामती तालुक्यातून दोन उमेदवारी अर्ज त्यांच्या सूचकांमार्फत गुरुवारी (ता. २ डिसेंबर) दाखल केले आहेत. तर काल शुक्रवारी (ता. ३ डिसेंबर) दिलीप वळसे पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे तीन दिवसात ३ मंत्र्यांनी अर्ज दाखल केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com