Ambegaon Political News : आंबेगाव विधानसभा मतदासंघातून मंत्री दिलीप वळसे पाटील नाही, तर त्यांची कन्या निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू होती. मात्र ती चर्चा बिनबुडाची असल्याचे स्पष्ट करत दिलीप वळसे पाटील यांनी तेच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. वळसे पाटील यांच्या स्पष्टीकरणानंतर आता त्यांच्या कन्येबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळला आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवारांचे Sharad Pawar अतिशय विश्वासू मानले जाणारे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बंडात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ दिली. त्यानंतर शरद पवारांनी सोडून गेलेल्या नेत्यांची कोंडी करण्यास सुरूवात केली. त्यात मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे हे नेते पवारांच्या रडारवर आहेत. यातूनच दिलीप वळसे पाटील यांच्याऐवजी त्यांची कन्या पूर्वा वळसे पाटील या निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती.
शरद पवार काही दिवसांपूर्वी जुन्नर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी वळसे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. त्याचवेळी पूर्वा वळसे पाटील या शरद पवार गटाकडून निवडणूक लढणार असल्याचा चर्चा सुरू झाली होती. त्यावर आता खुद्द वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
वळसे पाटील Dilip Walse Patil म्हणाले, लोक अशी बातमी उठवतात, की दिलीप वळसे पाटील निवडणूक लढवणार नाही, तर त्यांची मुलगी रिंगणात उतरणार आहे. पण माझी कन्या निवडणूक लढवण्यास अजिबात तयार नाही. त्यामुळे नाईलाजाने मलाच निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सुरू असलेली सर्व कामे आपल्याला पुढे घेऊन जावे लागणार आहेत, असे म्हणत दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून शड्डू ठोकला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.