सुप्रिया सुळेंची मोठी घोषणा ; राज्यभर राबविणार हा उपक्रम

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (mp Supriya Sule) यांनी महत्वाची घोषणा केली. पुण्यात मोफत श्रवणयंत्र तपासणी शिबिरास भेट दिल्यानंतर त्या बोलत होत्या.
mp Supriya Sule
mp Supriya Sulesarkarnama
Published on
Updated on

पुणे : ऐकू न येण्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक संवाद साधू शकत नाहीत, मुले सर्व साधारण आयुष्याचा आनंद घेऊ शकत नाहीत, यावर मात करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (mp Supriya Sule) यांनी महत्वाची घोषणा केली. पुण्यात मोफत श्रवणयंत्र तपासणी शिबिरास भेट दिल्यानंतर त्या बोलत होत्या.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई (Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai), अपंग हक्क विकास मंच, ठाकरसी ग्रुप, मुंबई, स्वरूप चॅरिटेबल ट्रस्ट आणि महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (District Disability Rehabilitation Center) यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील कर्णबधीर मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित या तपासणी शिबिरात एकूण सातशे जणांची तपासणी करण्यात आली.

mp Supriya Sule
मलिकांच्या टि्वटनंतर 'मुंबई रिव्हर अँथम'मधून जयदीप राणाला वगळलं?

'कर्णबधिर मुलांच्या कानावर ध्वनीलहरी गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद माझे समाधान द्विगुणित करतो', अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सुळे यांच्या पुढाकाराने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

''केवळ श्रवणयंत्र नसल्यामुळे ऐकू न येणारे आणि वयामुळे ज्यांना कर्णबाधिरत्व आलेले आहे अशा महाराष्ट्रातील प्रत्येकाला ऐकू येण्यासाठी हा उपक्रम राज्यभर टप्याटप्याने राबविण्याचा आमचा मानस आहे. आतापर्यंत आम्ही या उपक्रमा द्वारे आम्ही ४० हजार जणांना श्रवणयंत्र वाटले आहे. भविष्यात आणखी जास्तीत जास्त कर्णबधीर मुले आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आम्ही पोहचणार आहोत,'' असे सुळे म्हणाल्या.

शिबिरार्थीशी संवाद साधताना सुळे म्हणाल्या, 'तुम्हा सर्वांना पूर्ववत ऐकू यावे यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. ऐकू न येण्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक संवाद साधू शकत नाहीत, मुले सर्व साधारण आयुष्याचा आनंद घेऊ शकत नाहीत. श्रवणयंत्र बसवून दिल्यानंतर त्यांच्या कानावर ध्वनी लहरी गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद अत्यंत समाधान देणारा असतो'. हा उपक्रम २०१३ पासून आपण राबवत असून यापुढेही असाच चालू राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. या दोन दिवसांत तपासणी झालेल्या सर्वांना पुढील महिनाभरात स्वतंत्र शिबीर आयोजित करून मोफत श्रवणयंत्र बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com