Maharashtra Election: उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. विरोधी पक्षाकडून निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप केला जातो आहे. उद्धव ठाकरेंनी तर त्यांच्या बॅगा तपासत असताना एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, मोदी-शहा यांच्या बॅगा तपासल्या का? असा प्रश्न देखील विचारला होता. त्यानंतर आज (बुधवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बॅग तपासल्याचे समोर आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या बॅगा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासण्यात आल्या आहेत. आपल्या ट्विटरच्या माध्यमातून आपल्या बॅगांची तपासणी झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'मी निवडणूक प्रचारासाठी जात असताना निवडणूक आयोगाने माझ्या बॅग आणि हेलिकॉप्टरची नियमित तपासणी केली. मी पूर्ण सहकार्य केले आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारच्या उपाययोजना स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी आवश्यक आहेत. आपण सर्वांनी कायद्याचा आदर करूया आणि आपल्या लोकशाहीची अखंडता टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देऊ या.'
उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी होत असताना त्यांनी व्हिडिओ काढत टीका केली होती. तसेच देवेंद्र फडणवीस, मोदी शहांच्या बॅगांची तपासणी केली का? असा प्रश्न विचारला होता. ठाकरेंच्या त्या टीकाला नाव न घेता भाजपने उत्तर दिले आहे. महाराष्ट्र भाजपकडून ट्विट करत उद्धव ठाकरेंचे नाव न घेत म्हटले आहे की, जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते!
महाराष्ट्र भाजपने आपल्या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या देखील बॅगांची तपासणी झाल्याचे म्हटले आहे. 7 नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हीडिओ काढला, ना कोणती आगपाखड केली. तत्पूर्वी, 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर सुद्धा देवेंद्रजी फडणवीस यांच्या बॅग्जची तपासणी झाली, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.