No vehicle day : सायकल-बसने या! शक्य असेल तर चालत या, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी केला कायमचा निर्णय

Kolhapur Zilla Parishad Decision After PM Modi Appeal : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करतानाच पेट्रोल-डिझेलच्या वापरात काटकसर करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या या आवाहनाला आता राज्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
Kolhapur Zilla Parishad No vehicle day Decision
Kolhapur Zilla Parishad No vehicle day Decision sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

  2. जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांनी कर्मचारी, अधिकारी आणि सदस्यांना दर शुक्रवारी खासगी वाहनांचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे.

  3. सार्वजनिक वाहतूक वापर वाढवणे, इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षण हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.

Kolhapur Zilla Parishad News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर कमी करावा शिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करावा असे आवाहन केल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांनी जिल्हा परिषदेच्या कर्मचारी, अधिकारी आणि सदस्यांना याबाबात आवाहन केले आहे. त्यांनी, दर शुक्रवारी जिल्हा परिषदेत मोठी वाहनं, दुचाकी, चारचाकी वाहनातून न येण्याचे विनंती केली आहे. त्याबाबत आज निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूर जिल्हा परिषदेने दर शुक्रवारी सायकल डे उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात पदाधिकारी सहभागी होणार आहेत. ज्यांना शक्य आहे, त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सायकल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतंर्गत बसेसचा वापर करावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांनी केले आहे.

जे अधिकारी, कर्मचारी कार्यालयापासून जवळच्या अंतरावर आहेत, त्यांनी चालत कार्यालयात यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. प्रत्येक शुक्रवारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Kolhapur Zilla Parishad No vehicle day Decision
Zilla Parishad fund dispute: आमदारांची कामे जिल्हा परिषदेच्या निधीतून का? कोल्हापूर झेडपीत नव्या वादाला फुटले तोंड

जिल्हा परिषद, पंचायत समितीकडील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे जिल्हा परिषदेकडील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही बस व सायकलींचा वापर करावा, असेही आवाहन अध्यक्षा खोत यांनी केले आहे.

Kolhapur Zilla Parishad No vehicle day Decision
Pune Zilla Parishad : लावा ताकद! 'झेडपी'त ‘बॅकडोअर एन्ट्री’चा रस्ता मोकळा; पुण्यात राष्ट्रवादीला 5 तर भाजप-सेनेला प्रत्येकी 1 जागा?

FAQs :

1. कोल्हापूर जिल्हा परिषदेने कोणता निर्णय घेतला?

दर शुक्रवारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दुचाकी व चारचाकी खासगी वाहनांचा वापर टाळावा असा निर्णय घेण्यात आला आहे.

2. हा निर्णय का घेण्यात आला?

इंधन बचत आणि सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

3. या निर्णयाचे आवाहन कोणी केले?

जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांनी हे आवाहन केले आहे.

4. पंतप्रधान मोदींनी काय आवाहन केले होते?

इंधनाचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करावा असे आवाहन त्यांनी केले होते.

5. या उपक्रमाचा फायदा काय होणार?

इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि वाहतूक व्यवस्थेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com