Pune News : खुनाच्या गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या गुंडाला हॉटेलमध्ये घेऊन जाणे तीन पोलिसांना चांगलेच भोवले आहे. गुंडाला हॉटेलमध्ये घेऊन गेल्यानंतर तेथून तो गुंड पसार झाल्यामुळे तीन पोलिसांना थेट निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी या तीन पोलिसांच्या निलंबनाचा आदेश जारी केला.
निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये पोलीस हवालदार मुरलीधर महादू कोकणे, पोलीस नार्इक नीलेश विनायक गुरव, राजूदास रामजी चव्हाण, अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. हडपसर परिसरामध्ये दहशत माजविणारा गुंड राजेश कांबळे (वय ३६, रा.काळेपडळ, हडपसर) हा दोन ऑगस्टला पोलिसांना चकवा देत पसार झाला होता.
न्यायालयामधून कारागृहात नेत असताना तीन पोलिसांनी कांबळे या आरोपीला परस्पर न्यायालय परिसरातील एका हॉटेलमध्ये नेले होते. मात्र, येथून आरोपी पोलिसांना चकवा देत पसार झाला. यानंतर आरोपलीला पकडण्यासाठी पोलिसांनी शिवाजीनगर परिसरात नाकाबंदी करून त्याचा शोध घेतला. पण पोलिसांना आरोपी सापडला नाही.
पसार झालेल्या कांबळेचा शोध पोलीस घेत असून कांबळे याच्याविरुद्ध खून, खुनी हल्ले आणि लूटमारीचे गुन्हे दाखल आहेत. अनेक गुन्हेगारी कारवायांमुळे गेल्या दोन वर्षांपूर्वी त्याच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली होती.
या खटल्याच्या सुनावणीसाठी त्याला 2 ऑगस्टला पोलिसांनी येरवडा कारागृहातून शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात आणले होते. पण सुनावणी झाल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात नेण्यापूर्वी बंदोबस्तावरील तीन पोलिसांनी आरोपीला हॉटेलमध्ये नेले होते. येथूनच आरोपी पसार झाला होता.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.